‘ऑनलाइन धान्य पासिंग’मध्ये ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अडथळा!
By admin | Published: March 19, 2017 02:12 AM2017-03-19T02:12:00+5:302017-03-19T02:12:00+5:30
शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणास विलंब होत आहे.
संतोष येलकर
अकोला, दि. १८- सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत तहसील कार्यालयांमध्ये 'ऑनलाइन धान्य पासिंग' करताना 'नेट कनेक्टिव्हिटी'च्या अभावामुळे रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करताना विलंब होत आहे. त्यामुळे अमरावती विभागातील पाचही जिल्हय़ात 'ऑनलाइन धान्य पासिंग'मध्ये 'नेट कनेक्टिव्हिटी'चा अडथळा निर्माण होत आहे.
सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील आणि अंत्योदय योजनेंतर्गत शिधापत्रिकाधारकांना दरमहा रास्त भाव दुकानांमधून धान्य वितरित करण्यात येते. त्यासाठी पुरवठा विभागामार्फत दरमहा तालुकानिहाय धान्याचे नियतन मंजूर झाल्यानंतर तहसील कार्यालयांमध्ये रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करण्यासाठी ह्यऑनलाइन धान्य पासिंगह्ण केले जाते; परंतु सर्व्हरवरील वाढत्या ताणामुळे अमरावती विभागातील अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ या पाचही जिल्हय़ातील तहसील कार्यालयांमध्ये ह्यनेट कनेक्टिव्हिटीह्णच्या अभावामुळे ह्यऑनलाइन धान्य पासिंगह्णमध्ये वारंवार अडथळा निर्माण होत आहे. नेट कनेक्टिव्हिटीच्या अभावामुळे ऑनलाइन धान्य पासिंगचे काम संथगतीने होत असल्याने, रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करण्यास विलंब होत आहे.
शिधापत्रिकाधारकांना वेळेवर मिळत नाही धान्य!
'नेट कनेक्टिव्हिटी'च्या अभावामुळे 'ऑनलाइन धान्य पासिंग'च्या अडथळ्यांमध्ये रास्त भाव दुकानदारांना धान्य वाटप करण्यास विलंब होतो. त्यामुळे दरमहा रास्त भाव दुकानांमधून शिधापत्रिकाधारकांनाही वेळेवर धान्य मिळत नाही. शिधापत्रिकाधारकांना धान्य वितरणास विलंब होत आहे.