राष्ट्रीयीकृत बँक कर्मचा-यांचा संप
By admin | Published: December 6, 2014 12:47 AM2014-12-06T00:47:41+5:302014-12-06T00:47:41+5:30
अकोला शहरात निघाली मोटारसायकल रॅली.
अकोला : वेतनवाढीसह इतर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राष्ट्रीयीकृत बँकांनी शुक्रवार, ५ डिसेंबर रोजी एकदिवसीय संप पुकारला. संपात सहभागी झालेल्या अकोल्यातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचार्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून मोटारसायकल रॅली काढली.
पगारवाढ, खाजगीकरणाला धक्का, विलिनिकरण, एफडीआयचा शिरकाव आणि कर्जबुडव्यांवर कारवाई अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी देशातील राष्ट्रीयीकृत बँकांनी २ डिसेबरपासून पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण असा विभागनिहाय एकदिवसीय संप पुकारला. शुक्रवार ५ डिसेंबर रोजी पश्चिम विभागातील महाराष्ट्र, गोवा व गुजरात या तिन्ही राज्यांमधील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचार्यांनी संप पुकारला. या संपात अकोला जिल्ह्यातील दोन हजार बँक कर्मचारी सहभागी झाले होते.
*शहरात निघाली मोटरसायकल रॅली
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनसह इतर ८ बँक संघटनांशी निगडित असलेल्या शहरातील राष्ट्रीयीकृत बँक कर्मचार्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता सातव चौकातून मोटारसायकल रॅली काढली. रॅलीमध्ये मोठय़ा संख्येने बँक कर्मचारी सहभागी झाले होते.