एमराॅल्ड स्कूलच्या कारभारासाठी नव्याने समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2020 04:45 AM2020-12-11T04:45:26+5:302020-12-11T04:45:26+5:30
काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने केशव नगरातील एमराॅल्ड हाइट्स स्कूलची प्राथमिक चाैकशी केली हाेती. याबाबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व ...
काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाने केशव नगरातील एमराॅल्ड हाइट्स स्कूलची प्राथमिक चाैकशी केली हाेती. याबाबत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख व पालकांनी तक्रार केली हाेती. या तक्रारीनुसार जि.प.च्या शिक्षण विभागाने प्राथमिक चाैकशीसाठी समिती स्थापन केली. या समितीने प्राथमिक अहवाल सादर केला. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. एमराॅल्ड हाइट्स स्कूलला (केवश नगर, रिंग राेड) स्टेट बाेर्डाची मान्यता असतानाही सीबीएससी पॅर्टनवर आधारित खासगी प्रशासनाची पुस्तके, शाळेचा लाेगाे असलेल्या वह्या व गणवेशाची विक्री शाळेतूनच हाेत असल्याचे दिसून येते, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले हाेते. मान्यता स्टेट बाेर्डाची असतानाही ती सीबीएससी असल्याचे भासवून पालकांची दिशाभूल व विद्यार्थ्यांची फसवणूक केली. त्यानुषंगाने शुल्क वसूल केले, असेही एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले हाेते, गुरुवारी छावाचे अध्यक्ष शंकरराव वाकाेडे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्राथमिक शिक्षणाधिकारी यांची दालनात भेट घेऊन कारवाईची मागणी आक्रमकपणे रेटल्यावर आता पुन्हा एक समिती गठित झाली आहे.