हवाई सफरीने स्मित जाणार नवी दिल्लीला
By admin | Published: July 6, 2014 07:46 PM2014-07-06T19:46:31+5:302014-07-07T00:56:59+5:30
लोकमतच्या माध्यमातून ‘संस्काराचे मोती’ या उपक्रमाने अकोल्यातील स्मित सोमवंशी या विद्यार्थ्याला विमानाने दिल्ली गाठण्याची ‘गूड न्यूज’ दिली आहे.
अकोला : हवाई सफरीचे स्वप्न प्रत्येकालाच असते; पण योग येत नाही, तशी संधीही मिळत नाही. लहान वयात विमानात बसण्याची संधी मिळणे तसे नशीबच; पण लोकमतच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालणार्या ह्यसंस्काराचे मोतीह्ण या उपक्रमाने अकोल्यातील भारत विद्यालयात शिकणार्या सातवीच्या स्मित सुधीर सोमवंशी या विद्यार्थ्याला विमानाने दिल्ली गाठण्याची ह्यगूड न्यूजह्ण दिली आहे. येत्या १0 जुलैला तो विमानाने दिल्ली गाठणार आहे. २0१३ वर्षात ह्यसंस्काराचे मोतीह्ण या उपक्रमावर आधारित ही स्पर्धा घेण्यात आली होती. राज्यभरातून तब्बल २५ लाखावर विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला होता. जवळपास ३000 शाळांच्या विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश होता. अकोल्यातील सर्वच शाळांच्या बहुतांश विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून या स्पर्धेसाठी प्रत्येकी एका विद्यार्थ्याची निवड झाली आहे. त्यात अकोला जिल्ह्यातून भारत विद्यालयाच्या स्मित सुधीर सोमवंशी या विद्यार्थ्याची निवड झाली आहे. लोकमतच्या ह्यसंस्काराचे मोतीह्ण उपक्रमातून स्मितची एकमेव निवड झाल्याने त्याचा भारत विद्यालयाच्यावतीने सत्कार करण्यात आला. स्पर्धात्मक परीक्षेच्या अनुषंगाने लोकमतमध्ये सुरू असलेला ह्यसंस्काराचे मोतीह्ण हा उपक्रम प्रेरणादायी असून, चालू सत्रात लोकमतमध्ये सुरू असलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांंनी मोठय़ा संख्येत सहभागी व्हावे, असे आवाहन भारत विद्यालयाच्यावतीने आयोजित सत्कार सोहळ्यात मुख्याध्यापक व मान्यवरांनी केले. यावेळी निशिकांत पुजारी, मुख्याध्यापिका मनीषा अभ्यंकर, उपमुख्याध्यापिका डॉ. वर्षा पाटील, पर्यवेक्षक घोगरे सर, वर्गशिक्षिका अलका गवई, स्मितची आई वैशाली सोमवंशी, ग्रंथालय प्रमुख सरकटे सर, मल्लेकर सर, लोकमत वितरण विभागाचे प्रकाश वानखेडे व इतर शिक्षक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. संचालन मल्लेकर सर यांनी, तर प्रास्ताविक आशीष वानखडे यांनी केले.