कार्बन फायबरला दिली नवीन ओळख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:17 AM2021-01-04T04:17:18+5:302021-01-04T04:17:18+5:30

मूर्तिजापूर : लॉकडाऊनच्या काळात पुरेशी संसाधने उपलब्ध नसतानासुद्धा स्वतःच्या २०० सी.सी. मोटारसायकलवर पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनविलेली व यशस्वीपणे काम ...

New introduction to carbon fiber | कार्बन फायबरला दिली नवीन ओळख

कार्बन फायबरला दिली नवीन ओळख

Next

मूर्तिजापूर : लॉकडाऊनच्या काळात पुरेशी संसाधने उपलब्ध नसतानासुद्धा स्वतःच्या २०० सी.सी. मोटारसायकलवर पूर्णपणे कार्बन फायबरपासून बनविलेली व यशस्वीपणे काम करणारी ऑईल फिल्टर कॅप येथील युवकाने घरीच बनविली. ती कॅप त्याने त्याच्या २०० सी.सी. मोटारसायकलवर यशस्वीपणे बसविली. ती कॅप बसविल्यापासूून आजपर्यंत ३००० (तीन हजाार) पेक्षा जास्त कि.मी.चे अंंतर त्याने बाईकवरून कापल्यानंतरही इंजिनच्या अती उष्ण तेलाची धग सहन करीत ती कॅप अजूनही टिकून ‘जैसे थे’ स्थितीत आहे. ही कामगिरी यशस्वी केली आहे. मूर्तिजापूर येथील २२ वर्षीय शिवम कुर्मदास काळे या युवकाने.

सन १९५८ मध्ये कार्बन फायबरचा शोध लागला. कार्बन फायबरचा वापर अनेक प्रकारच्या अत्याधुनिक स्पोर्ट्स कार्स, मोटारसायकल्स, रॉकेट्समध्ये त्यांचे वजन कमी करणे व त्यामध्ये मजबुती यावी, या उद्देशाने केला जातो; परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे कार्बन फायबरचा वापर नामांकित कार कंपन्या अद्यापही आय.सी. इंजिनमध्ये सफलतेने करू शकल्या नाहीत, असे युवकाचे मत आहे.

आजपर्यंत कोणीही कार्बन फायबरपासून बनविलेला एखादा भाग १० कि.मी.चेसुद्धा आंतर कापू शकल्याची नोंद कुठेही नसल्याचेसुद्धा त्याने म्हटले आहे. शिवमने निर्माण केलेल्या या ऑईल फिल्टर कॅपमध्ये विशिष्ट प्रकारचे काेटिंग (आवरण) व सामग्रीचा वापर केला असून, ती कॅप ओइएम (ओरिजिनल इक्विपमेंट मॅनीफ्रॅक्चर) पेक्षा ३० टक्क्यांनी हलकी व टिकाऊ आहे. शिवमचा हा आविष्कार एकमेव असल्याचे इटली येथील पॉलिमोटर्सचे मालक मॅथ्यू हॉटझबर्ग यांनी म्हटले आहे. शिवमच्या या संशोधनाने त्याचे अभियांत्रिकीचे ज्ञान फलद्रूप झाले आहे, असे म्हणावे लागेल. सध्या तो कार्बन फायबरपासून बनविलेल्या ऑईल फिल्टर कॅपसाठी पेटंट करीत आहे.

--------------------------------

अलीकडेच कम्पोजिट (संयोजन) बनविणाऱ्या कंपनीची मी स्थापना केली आहे. ज्यामध्ये मेड इन इंडिया ही संकल्पना समोर ठेवून काम केले जाईल. सध्या कार्बन फायबरपासून बनविलेल्या ऑईल फिल्टर कॅपसाठी पेटंट करीत आहे.

-शिवम काळे, मूर्तिजापूर

Web Title: New introduction to carbon fiber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.