नवीन मुगाचे दर घटले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 01:50 AM2017-09-16T01:50:39+5:302017-09-16T01:50:42+5:30
अकोला : बाजारात नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, हमी दराच्या तुलनेत सध्या मूग ७५0 रुपये इतक्या कमी दराने खरेदी केला जात आहे. मागच्या महिन्यात मुगाचे प्रति िक्ंवटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. नवीन मुगाची आवक सुरू होताच हे दर पडले आहेत. राज्यात जवळपास हीच स्थिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : बाजारात नवीन मुगाची आवक सुरू झाली असून, हमी दराच्या तुलनेत सध्या मूग ७५0 रुपये इतक्या कमी दराने खरेदी केला जात आहे. मागच्या महिन्यात मुगाचे प्रति िक्ंवटल दर सहा हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. नवीन मुगाची आवक सुरू होताच हे दर पडले आहेत. राज्यात जवळपास हीच स्थिती आहे.
यावर्षी केंद्र शासनाने मुगाचे हमी दर ५,३७५ रुपये प्र ितक्विंटल जाहीर केले आहेत. तसेच प्रतिक्विंटल २00 रुपये बोनसही जाहीर केला आहे. यावर्षी पूरक पाऊस नसल्याने मुगाचे नुकसान झाले असून, बाजारात आवक र्मयादित आहे, असे असतानाही दर प्रचंड घसरले आहेत. ऑगस्ट महिन्यात हेच दर ५,८00 ते ६ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत पोहोचले होते.यावर्षी काढणी हंगामाच्या अगोदर हे दर होते. हंगाम सुरू होताच या दरात घट झाली आहे. यावर्षी पावसाचा फटका या पिकाला बसल्याने सर्वत्र उत्पादन कमी झाले आहे. शुक्रवारी अकोला कृषी उत्पन्न बाजार समि तीमध्ये ७२८ क्विंटल मुगाची आवक झाली. आठ दिवसां पूर्वी हीच आवक ९२७ क्विंटल होती.यावर्षी सर्वच पिकांची स्थिती दोलायमान असून, उत्पादनही कमी होत असल्याचे मुगाच्या आवकवरू न अधोरेखित होत असताना, दर कमी झाले असून, आर्थिक कोंडी केली जात असल्याची भावना शेतकर्यांमध्ये निर्माण झाली आहे.
२00 रुपये बोनस
शासनाने हमी दरासोबत प्रतिक्विंटल २00 रुपये बोनस जाहीर केला आहे. त्यामुळे ५,३७५ रुपयांसह २00 मिळून शेतकर्यांना ५,५७५ रुपये प्रतिक्विंटल दर मिळायला हवे; परंतु बाजारात दर पडले असून, हमी दरापेक्षा कमी दराने मुगाची खरेदी सुरू आहे. त्यामुळे शासकीय खरेदी केव्हा सुरू होते, याकडे शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
मुगाला यावर्षी ५,३७५ रुपये हमी भाव असून, २00 रुपये बोनस जाहीर करण्यात आला आहे; परंतु बाजारातील स्थिती बघता सध्या ४,0३0 ते ४,२२५ रुपये प्रतिक्विंटल खरेदी सुरू आहे.
- सुनील मालोकार,
सचिव,अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोला.