नवीन उडीद, मुगाला हमीभावापेक्षा कमी भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:23 AM2021-09-05T04:23:06+5:302021-09-05T04:23:06+5:30
दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गाने शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. मान्सून वेळेवर दाखल झाला; पण पावसाने २०-२२ दिवस दडी मारल्याने उडीद, मूग ...
दरवर्षीप्रमाणे यंदाही निसर्गाने शेतकऱ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. मान्सून वेळेवर दाखल झाला; पण पावसाने २०-२२ दिवस दडी मारल्याने उडीद, मूग पेरणीचा हंगाम निघून गेला. ज्या शेतकऱ्यांनी उशिरा पेरणी केली, त्यांच्या पिकांना उत्पादनाचीही श्वाश्वती उरली नाही, तर सुरुवातीला पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचा उडीद, मूग बाजारात येऊ लागला आहे. यंदातही चांगले दर मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती; परंतु उत्पादनात घट झाल्यानंतरही बाजार समितीत उडीद व मुगाला हमीदराच्याही कमी दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.
असा आहे हमीदर
उडीद ६३००
मूग ७२७५
असा मिळतोय भाव
उडीद ५५००
मूग ६३००
शनिवारी बाजार समितीत आवक
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन उडीद व मुगाची आवक सुरू आहे. शनिवारी नवीन उडिदाची १०७, तर मुगाची ११५ क्विंटल आवक झाली होती. काही दिवसांमध्ये आणखी आवक वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
बाजार समितीत उडीद, मुगाची आवक सुरू झाली आहे. सध्या मालात ओलावा अधिक प्रमाणात आहे. त्यामुळे दरही कमी आहे. पुढील काही दिवसांत आवक वाढेल.
- अनिल पेढीवाल, व्यापारी