नवीन कामांचे नियोजन अडकले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2016 03:12 AM2016-10-15T03:12:20+5:302016-10-15T03:12:20+5:30
जुन्या रस्ते कामांच्या ‘वर्क ऑर्डर’; चार कोटींची कामे केव्हा मार्गी लागणार?
संतोष येलकर
अकोला, दि. १४- जिल्हय़ात ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) गतवर्षी उपलब्ध निधीतून जुन्या कामांचे कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्याची प्रक्रिया जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत सुरू करण्यात आली; मात्र यावर्षी रस्ते कामांसाठी उपलब्ध चार कोटींच्या निधीतून नवीन रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषदेच्या कारभारात अद्यापही अडकले आहे. त्यामुळे निधी उपलब्ध असताना ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी सन २0१५-१६ या वर्षात जिल्हा नियोजन समितीमार्फत (डीपीसी) सात कोटींचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला. उपलब्ध निधीतून ६५ रस्ते कामांचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले. त्यानुसार या रस्ते कामांसाठी कार्यारंभ आदेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. १४ ऑक्टोबरपर्यंंंंत २२ रस्ते कामांच्या ह्यवर्क ऑर्डरह्ण जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत देण्यात आल्या. वर्षभरापूर्वी उपलब्ध निधीतून ग्रामीण भागातील रस्ते कामांच्या वर्क ऑर्डर देण्यात येत आहेत; परंतु सन २0१६-१७ या वर्षी जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत गत मार्चअखेर जिल्हा परिषदेला चार कोटींचा निधी उपलब्ध झाला; मात्र सहा महिने उलटून जात असले, तरी उपलब्ध निधीतून जिल्हा परिषदेमार्फत जिल्हय़ातील नवीन रस्ते कामांचे नियोजन अद्याप करण्यात आले नाही. निधी उपलब्ध असताना गत सहा महिन्यांच्या कालावधीत जिल्हा परिषदेच्या कारभारात नवीन रस्ते कामांचे नियोजन अडकले आहे. त्यामुळे उपलब्ध निधीतून ग्रामीण भागातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सर्वसाधारण सभेची मान्यताही प्रलंबित!
जिल्हय़ातील ग्रामीण भागातील रस्ते कामांसाठी ह्यडीपीसीह्णमार्फत चार कोटींचा निधी उपलब्ध झाल्यानंतर सहा महिन्यांचा कालावधी उलटून जात आहे; मात्र या निधीतून नवीन रस्ते कामांसाठी नियोजनाच्या विषयाला जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेची मान्यता मिळणे अद्याप प्रलंबित आहे. सर्वसाधारण सभेची मान्यता आणि प्रशासकीय मान्यता केव्हा मिळणार आणि प्रत्यक्षात जिल्हय़ातील रस्त्यांची कामे केव्हा मार्गी लागणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन २0१५-१६ मध्ये उपलब्ध निधीतून मंजूर ६५ रस्ते कामांसाठी ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी आतापर्यंंंंत २२ रस्ते कामांच्या ह्यवर्क ऑर्डरह्ण देण्यात आल्या आहेत. सन २0१६-१७ या वर्षात उपलब्ध निधीतील नवीन रस्ते कामांचे नियोजन अद्याप बाकी आहे. जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेच्या मंजुरीनंतर ही कामे मार्गी लागतील.
- अनंत गणोरकर
कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग, जिल्हा परिषद.