वृत्तपत्र टॅक्सीची उभ्या ट्रॅक्टरला धडक; दोन ठार : ३ गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:48 AM2020-01-18T11:48:32+5:302020-01-18T11:49:21+5:30
अपघातात दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ शनिवारी पहाटे घडली.
मूर्तिजापूर : नागपूर वरुन मूर्तिजापूरकडे वृत्तपत्र घेऊन येणाऱ्या वाहनाने उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार, तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना राष्ट्रीय महामार्गावरील कोहिनूर ढाब्याजवळ शनिवारी पहाटे घडली. मृतांमध्ये एका तृतीयपंथीचा समावेश आहे.
पहाटे ३:३० वाजता पोलीसांनी खरबडी येथे जात असलेला ट्रॅक्टर अडवून सदर ट्रॅक्टर पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाण्यासाठी समोर चुडे नामक पोलीस शिपाई आपल्या बुलेट दुचाकी घेऊन चालत असताना अचानक कुत्र्याचे पिल्लू आडवे आले तेव्हा पोलीस शिपायाने आपल्या दुचाकीचे जोरदार ब्रेक लावल्याने मागून येणा?्या ट्रॅक्टरचा धक्का बुलेटला लागला व सदर पोलीस दुचाकी घेऊन खाली पडल्याने त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. ट्रॅक्टर चालकाला त्याचा ट्रॅक्टर घटनास्थळी थांबून ठेवण्याचे पोलिसांनी सांगीतले. सदर ट्रॅक्टर क्रमांक एमएच ३० जे ९६२३ हा रस्त्यावर उभा होता वृत्तपत्र घेऊन येणाºया टॅक्सी क्रमांक एमएच ४९ एफ ०५४९ हे बोलेरो वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली. यामध्ये प्रेरणा (३५) नामक तृतीयपंथी रा. अकोला ही घटनास्थळी ठार झाली. तर तेल्हारा पंचायत समिती मध्ये जि. प. शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मोहम्मद सादीक अब्दुल समद(४५) रा. खामगाव यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तर अपघात गंभीर जखमी झालेले ऐनुल्ला शेख रा. खामगाव, हे शिक्षक , ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल नितीन चुडे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.तर इरफाना ही तृतीयपंथी मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. पुढील तपास ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करीत आहेत.