वृत्तपत्र विक्रेत्यांना वितरणाची अडचण नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:18 AM2021-05-10T04:18:23+5:302021-05-10T04:18:23+5:30
अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ...
अकोला: कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजना आणि लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या अंमलबजावणीसंदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी कोरोना काळात वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे मत व्यक्त करतानाच साेमवारपासून लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामध्ये वृत्तपत्र विक्रेत्यांना वितरणाची अडचण नाही, असे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी रविवारी ‘लोकमत’शी बाेलताना स्पष्ट केले. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी उपाययोजना आणि निर्बंधांच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचे काम वृत्तपत्रांकडून होत आहे. जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी रविवार, ९ मे रोजी रात्री १२ वाजतापासून १५ मे रोजी रात्री १२ वाजेपर्यंत जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले असून, या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश यंत्रणांना देण्यात आले आहेत. जिल्ह्यात सहा दिवसांच्या कडक निर्बंधांच्या कालावधीत वैद्यकीय सेवा, मेडिकल्स, दवाखाने व दुधाचे वितरण वगळता, इतर सर्व दुकाने आणि आस्थापना बंद राहणार आहेत. कोरोना काळात जिल्ह्यातील जनतेपर्यंत माहिती पोहोचविण्याचे काम करीत असलेल्या वृत्तपत्रांचे वितरण कडक निर्बंधांच्या कालावधीत सुरू राहणार आहे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.
.........................फोटो....................