उत्पन्न वाढीला बगल; मनपाची आर्थिक स्थिती बिकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:32 AM2021-03-13T04:32:48+5:302021-03-13T04:32:48+5:30

राजकारण्यांच्या ‘इंटरेस्ट’मुळे भाडेवाढ ठप्प शहरात मनपाच्या मालकीच्या जागेवर टाेलेजंग व्यावसायिक संकुलांची उभारणी करण्यात आली. त्यामधील दुकाने भाडेतत्त्वावर देण्यात आली ...

Next to income growth; The financial condition of the corporation is dire | उत्पन्न वाढीला बगल; मनपाची आर्थिक स्थिती बिकट

उत्पन्न वाढीला बगल; मनपाची आर्थिक स्थिती बिकट

googlenewsNext

राजकारण्यांच्या ‘इंटरेस्ट’मुळे भाडेवाढ ठप्प

शहरात मनपाच्या मालकीच्या जागेवर टाेलेजंग व्यावसायिक संकुलांची उभारणी करण्यात आली. त्यामधील दुकाने भाडेतत्त्वावर देण्यात आली असून त्यापासून मनपाला आर्थिक उत्पन्न प्राप्त हाेते. अशा दुकानांची संख्या सुमारे ७०० पेक्षा अधिक आहे. यातील बहुतांश दुकाने सवर्पक्षीय पदाधिकारी, आजी, माजी नगरसेवकांच्या नातेवाइकांनी भाडेतत्त्वावर घेतल्या आहेत. तीन वर्षांपूर्वी तत्कालीन आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दुकानांच्या भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला हाेता. दुकानांची भाडेवाढ केल्यास खिशाला झळ लागण्याच्या धास्तीने मनपा पदाधिकारी सर्वपक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव बाजूला सारला हाेता.

माेबाइल कंपन्यांची मनमानी

शहरात सर्वत्र माेबाइल कंपन्यांनी टाॅवरची उभारणी केली आहे. दरवर्षी मालमत्ता कर विभागाकडून परवान्याचे नूतनीकरण करून घेणे व मालमत्ता कर जमा करणे भाग असताना तब्बल २२० माेबाइल कंपन्यांनी नूतनीकरण केले नसून सुमारे पाच काेटी रुपये टॅक्सचा भरणादेखील केला नाही. या प्रकरणाला ‘लाेकमत’ने चव्हाट्यावर आणल्यानंतर मनपाने नाेटीस जारी केल्या. अद्यापपर्यंतही कंपन्यांनी ही रक्कम जमा केली नाही, हे विशेष.

Web Title: Next to income growth; The financial condition of the corporation is dire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.