‘एनएचएम’ कर्मचाºयांना मिळणार विम्याचे कवच!
By atul.jaiswal | Published: August 11, 2017 06:22 PM2017-08-11T18:22:50+5:302017-08-11T18:22:50+5:30
अकोला : राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेल्या कर्मचाºयांना आता विम्याचे कवच मिळणार आहे. या कर्मचाºयांना विमा सुविधा लागू करण्यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती, सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान, मुंबई यांनी मागविली आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत आरोग्य विभागातील विविध पदांवर कंत्राटी पद्धतीने अधिकारी व कर्मचारी अत्यंत तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. हे कर्मचारी गत अनेक वर्षांपासून शासकीय सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्याच्या मागणीसाठी लोकशाही मार्गाने लढा देत आहेत. या कंत्राटी कर्मचारी व अधिकाºयांना शासकीय सेवेत नियमित स्वरूपात घेण्याच्या शक्यता पडताळण्यासाठी शासनाने गत महिन्यात आयुक्त आरोग्यसेवा तथा अभियान संचालक यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती गठित केल्याने या कर्मचाºयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. आता या कर्मचाºयांना विमा सुविधा लागू करण्याचाही निर्णय शासनाने घेतला आहे. विमा योजनेत कर्मचाºयांचा समावेश करता यावा, यासाठी त्यांची वैयक्तिक माहिती विहित नमुन्यात मागविण्यात आली आहे. जिल्हाभरातील कर्मचाºयांची माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी जिल्हा संनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी यांच्याकडे देण्यात आली आहे. ही योजना त्वरित राबविण्यात येणार असल्यामुळे कर्मचाºयांची माहिती १४ आॅगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश सहसंचालक (अतांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान यांनी दिले आहेत. याबाबतचे पत्र सर्व संबंधित अधिकाºयांना ८ आॅगस्ट रोजी देण्यात आले आहे. विमा योजनेत सर्वच कर्मचाºयांचा समावेश करण्यात येणार असून, कोणताही कर्मचारी या योजनेपासून वंचित राहू नये, अशा सूचना या पत्रात देण्यात आल्या आहेत.