उमरीमधून रात्रीचा प्रवास धोक्याचाच; झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:24 AM2021-09-16T04:24:40+5:302021-09-16T04:24:40+5:30

कुत्रे आवरा हो! महिना श्वानदंश जानेवारी - २२ फेब्रुवारी - १८ मार्च - २४ ...

The night journey from Umari is dangerous; The mob took control of the road! | उमरीमधून रात्रीचा प्रवास धोक्याचाच; झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा!

उमरीमधून रात्रीचा प्रवास धोक्याचाच; झुंडींनी घेतला रस्त्याचा ताबा!

Next

कुत्रे आवरा हो! महिना श्वानदंश

जानेवारी - २२

फेब्रुवारी - १८

मार्च - २४

एप्रिल - २१

मे - १७

जून - ४२

जुलै - ४९

ऑगस्ट - ६१

या चौकात जरा सांभाळून

उमरी ते गुडधी रस्ता, अकाेटफैल चाैक, माेहम्मद अली मार्ग, गवळीपुरा, सिंधी कॅम्प परिसर, काैलखेड मार्ग, वाशिम बायपास चाैक, भांडपुरा चाैक, श्रीवास्तव चाैक, गुलजारपुरा चाैक, दगडी पूल आदी भागांत भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे.

नसबंदीसाठी ७५ लाखांची तरतूद

कुत्र्यांच्या नसबंदीसाठी मनपा प्रशासनाने मार्च महिन्यांत २५ लाख रुपयांची तरतूद केली हाेती. यापैकी संबंधित संस्थेला देयकापाेटी १३ लाख अदा करण्यात आले. तसेच सप्टेंबर महिन्यांत १५ व्या वित्त आयाेगातून तब्बल ५० लाखांची तरतूद केली. दरम्यान, कुत्र्यांची नसबंदी केल्यानंतर त्यांना ओळखायचे कसे, मनपाने आजवर किती कुत्र्यांची नसबंदी केली, याबद्दल सावळा गाेंधळ असल्याने मनपाच्या हेतूवर शंका निर्माण झाली आहे.

आठ महिन्यांत २५४ जणांना ॲंटिरेबीज

मागील आठ महिन्यांत मनपा क्षेत्रात पिसाळलेल्या कुत्र्यांनी २५४ जणांना चावा घेतल्याची प्रकरणे आहेत. या सर्वांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात येऊन त्यांना ॲंटिरेबीज लस देण्यात आली. जिल्हाभरात ९४८ जणांना पिसाळलेल्या कुत्र्यांनी चावा घेतला आहे.

आम्हाला चोराची नाही, कुत्र्याची भीती वाटते !

रात्री नऊनंतर मुख्य रस्ते, ठरावीक चाैकांमध्ये माेकाट कुत्रे ठिय्या देतात. अशा ठिकाणी वाहन कितीही हळू चालवले तरीही ते मागे लागतात. अशावेळी अपघात हाेण्याची शक्यता बळावते.

- नाना टेकाडे, डाबकी राेड

मुख्य रस्तेच नव्हे तर गल्लीबाेळात कुत्र्यांची दहशत पसरली आहे. त्यांना पकडण्यासाठी मनपाची वाहने येत नाहीत. सायंकाळनंतर लहान मुले, महिला तसेच वयाेवृद्ध नागरिकांना घराबाहेर निघणे मुश्कील झाले आहे.

- बुडण गाडेकर, गवळीपुरा

भटके श्वान पकडण्यासाठी वाहन उपलब्ध असून संबंधित संस्थेच्या भ्रमणध्वनीवर संपर्क साधल्यास ते तातडीने दाखल हाेतात. नसबंदीची प्रक्रिया सुरू असून कालांतराने निश्चितच श्वानांच्या वाढत्या संख्येला आळा बसणार आहे.

- पूनम कळंबे, सहाय्यक आयुक्त मनपा

Web Title: The night journey from Umari is dangerous; The mob took control of the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.