पाणवठ्यातील पाणी प्यायल्याने नऊ शेळ्या, एका हरणाचा मृत्यू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:18 AM2021-03-18T04:18:32+5:302021-03-18T04:18:32+5:30

मुंडगाव: अकोट तालुक्यातील मुंडगाव परिसरातील अमीनपूर शेतशिवारातील एका पाणवठ्याद्वारे गुरांची तहान भागविली जाते. मात्र, मंग‌ळवारी या पाणवठ्यातील पाणी ...

Nine goats, one deer die after drinking water from a pond! | पाणवठ्यातील पाणी प्यायल्याने नऊ शेळ्या, एका हरणाचा मृत्यू!

पाणवठ्यातील पाणी प्यायल्याने नऊ शेळ्या, एका हरणाचा मृत्यू!

Next

मुंडगाव: अकोट तालुक्यातील मुंडगाव परिसरातील अमीनपूर शेतशिवारातील एका पाणवठ्याद्वारे गुरांची तहान भागविली जाते. मात्र, मंग‌ळवारी या पाणवठ्यातील पाणी प्यायल्याने सात बकऱ्या, दोन पिल्ले व एका हरणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. पाणवठ्यातील पाणी प्यायल्यानेच बकऱ्यांचा मृ्त्यू झाल्याचा दावा बकऱ्यांच्या मालकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच, वनविभाग व पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंडगाव येथील प्रफुल्ल राजू सरकटे, दीपक धांडे, अशोक नवलकार, भाष्कर बेलदार हे शेळ्या चारण्यासाठी अमीनपूर भागात गेले होते. या शिवारातील एका कृत्रिम पाणवठ्यातील पाण्यावर गुरांची तहान भागविली जाते. दरम्यान, या पाणवठ्यातील पाणी प्यायल्यानतंर काही वेळात शेळ्यांचा मृत्यू झाला, तसेच त्यांच्या नाकातून फेस आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. या घटनेमुळे पशुपालकांचे जवळपास एक लाख ६० हजारांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. घटनेबाबत वनविभाग व पोलिसांनी माहिती दिल्यानंतर, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन बकऱ्यांचे व हरणांचे शवविच्छेदन केले, तसेच पाणवठ्यातील पाण्याचा नमुना अमरावती येथे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. या प्रकरणामध्ये भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२चे कलम ९,३९,५१ अन्वये वन गुन्हा ५५/१७ दि १६/०३/२०२१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास उपवनसरक्षक के.आर.अर्जुना, सहायक उपवनसंरक्षक सुरेश वडोदे, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.एन.ओवे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोट वनविभागाचे वर्तुळ अधिकारी अजय बावने, एस.जी.जोंधळे, विकास मोरे, दीपक मेसरे हे करीत आहेत. शेळी मालकांनी अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (फोटो)

Web Title: Nine goats, one deer die after drinking water from a pond!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.