पिंजर परिसरात आणखी नऊ पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:18 AM2021-04-17T04:18:06+5:302021-04-17T04:18:06+5:30
-------------------------------- देवेंद्र भुयार यांना पीएच.डी. प्रदान निहिदा : सीएसएमएसएस छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलेकॉम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. देवेंद्र ...
--------------------------------
देवेंद्र भुयार यांना पीएच.डी. प्रदान
निहिदा : सीएसएमएसएस छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे इलेक्ट्रॉनिक्स ॲन्ड टेलेकॉम्युनिकेशन विभागप्रमुख प्रा. देवेंद्र लक्ष्मण भुयार यांना दि. १८ मार्च २०२१ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग या शाखेत पीएच.डी. प्रदान करण्यात आली. ‘रिअल टाइम इसीजी ट्रान्समिशन व्हाया वायरलेस कम्युनिकेशन’ या प्रबंधांर्तगत ही डिग्री प्रदान करण्यात आली. डॉ. अ.का. कुरेशी रिसर्च गाईड, प्रोफेसर ॲन्ड प्रिन्सिपॉल, मौलाना अहमद नदवी टेक्निकल कॅम्पस मालेगाव यांच्या मार्गदर्शनात हा प्रबंध भुयार यांनी सादर केला. पीएच.डी. प्रदान करताना त्यांना चेअरमन म्हणून डॉ. प्रवीण वक्ते, हेड ॲन्ड प्रोफेसर इन केमिकल टेक्नॉलॉजी विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ लाभले. तसेच रेफरी म्हणून डॉ. संदीपान पी. नरोटे, प्राचार्य शासकीय महिला निवासी तंत्रनिकेतन तासगाव, प्रा. विभाकर हे लाभले. पीएच.डी. डिग्री प्राप्त झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. यू. बी. शिंदे सर्व विभाग व स्टाफकडून अभिनंदन करण्यात आले. (वा.प्र.) ८ बाय ५ (पासपोर्ट फोटो)