अकोला जिल्ह्यात वेगवेगळय़ा अपघातात नऊ जण गंभीर जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 01:56 AM2018-02-26T01:56:35+5:302018-02-26T01:56:55+5:30
अकोला : जिल्ह्यात वेगवेगळ्य़ा चार अपघातांत नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. चान्नी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी झाले. तसेच चोहोट्टा बाजारजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याने दोन जण, बाळापूरजवळ ट्रक उलटल्याने चालक व आलेगावजवळ ऑटोतून पडल्याने महिला जखमी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्ह्यात वेगवेगळ्य़ा चार अपघातांत नऊ जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली. चान्नी फाट्यावर दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने पाच जण जखमी झाले. तसेच चोहोट्टा बाजारजवळ दोन दुचाकींची धडक झाल्याने दोन जण, बाळापूरजवळ ट्रक उलटल्याने चालक व आलेगावजवळ ऑटोतून पडल्याने महिला जखमी झाली.
वाडेगाव ते दिग्रस बु. रस्त्यावर चान्नी फाट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. विनोद हिवराळे रा. तुलंगा हे दुचाकीने घरगुती गॅस घेऊन डबल सीट जात होते. चान्नी फाट्याजवळ असलेल्या त्रिकोणी रस्त्यावर दिग्रस खुर्द येथील नागेश इंगळे हे दुचाकीने समोरून येत होते. या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जबर धडक झाली. यामध्ये तन्वी इंगळे, प्रदीप सिरसाट आणि विनोद हिवराळे हे गंभीर जखमी झाले, तर जगदेव इंगळे आणि नागेश इंगळे हे जखमी झाले. जखमींना तातडीने वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथून सवरेपचार रुग्णालय अकोला येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. स्थानिक मंगेश इंगळे, भिकाजी इंगळे, अशोक इंगळे, मिलिंद इंगळे यांनी जखमींना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तसेच सवरेपचार रुग्णालयात भारिप-बमसंचे सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी मदत केली. चोहोट्टा बाजारजवळ दुचाकी क्र.एमएच २७ बीपी ७५६0 व एमएच ३0 टी ८५९३ यांच्यामध्ये समारासमोर धडक झाली. यामध्ये देवीदास वनारे व सारीका वनारे हे जखमी झाले. त्यांना तातडीने अकोल्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळापूर शहराजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रक क्र.एमपी 0९ एचएफ ८४४९ उलटला. त्यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. नायगाव देशमुख येथून नातेवाइकाच्या मयत आटोपून परत येत असताना ऑटो एमएच ३0 - २६९२ मधून पडल्याने आशाबाई बालुसिंग जाधव (वय ५0) रा. शेकापूर या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने आलेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथून पुढील उपचारासाठी अकोला येथे हलवण्यात आले.