टाळेबंदीचे उल्लंघन, नऊ दूकानदारांना ठाेठावला दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:32 AM2021-03-04T04:32:41+5:302021-03-04T04:32:41+5:30

अकोला कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोनाच्या वाढत्या रुग्‍णांची संख्‍या लक्षात घेता संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र हे कंटेन्‍मेंट म्‍हणून घोषित ...

Nine shopkeepers fined for violating lockout | टाळेबंदीचे उल्लंघन, नऊ दूकानदारांना ठाेठावला दंड

टाळेबंदीचे उल्लंघन, नऊ दूकानदारांना ठाेठावला दंड

Next

अकोला

कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर अकोला महानगरपालिका क्षेत्रामध्‍ये कोरोनाच्या वाढत्या रुग्‍णांची संख्‍या लक्षात घेता संपूर्ण महानगरपालिका क्षेत्र हे कंटेन्‍मेंट म्‍हणून घोषित करण्‍यात आले असून संपूर्ण मनपा क्षेत्रामध्‍ये लॉकडाऊन लावण्‍यात आले आहे मात्र या नियमांचे उल्लंघन करत काही दुकाने सुरू असल्याची माहिती मनपाच्या पथकाला मिळाली. या माहितीवरून मनपा व पाेलीस प्रशासनाच्या पथकाने काला चबुतरा तसेच इंदूर गल्‍लीमधील नऊ दुकानांवर कारवाई केली

लाॅकडाऊनच्या कालावधीत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार केवळ जीवनावश्‍यक वस्‍तूंची विक्री करणाऱ्या आस्‍थापनांना सकाळी ८ दुपारी ३ वाजेपर्यंत मुभा देण्‍यात आली आहे. मात्र मंगळवारी अकोला महानगरपालिका क्षेत्रातील काला चबुतरा येथील इंदौर गल्‍ली मध्‍ये तसेच जठारपेठ येथील आस्‍थापनातील दुकानदारांनी आपली दुकाने उघडली होती. त्‍या अनुषंगाने अकोला महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाच्‍या वतीने सदर ठिकाणच्या आस्‍‍थापनांवर मनपा बाजार विभाग आणि अतिक्रमण विभागाव्‍दारे प्रत्‍येकी ५ हजार रुपयांची दंडात्ममक कारवाई करण्‍यात आली. दुकानदारांवर प्रत्‍येकी ५ हजार रूपये असा एकूण ५० हजार रुपयांची दंडात्‍मक कारवाई करण्‍यात आली आहे.

या कारवाईत परिविक्षाधीन पोलीस अधिकारी अमोल ठाकूर, सिटी कोतवाली पोलीस स्‍टेशनचे ठाणेदार उत्तम जाधव, मनपा अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, राजेंद्र देशमुख, पोलीस उपनिरीक्षक सुरज शिरसाट, बाजार विभागाचे संजय पाचपोर, सनी शिरसाट, सुरेंद्र जाधव, अनिल गरड, अभिजीत सांवग, समित शिरसाट, सुरक्षारक्षक सै. रफीक, पोलीस कर्मचारी काजी अब्‍बास अली, महेश श्रीवास, अवचार धार्मेग, इरमाते तसेच मनपा कर्मचारी व पोलीस कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

Web Title: Nine shopkeepers fined for violating lockout

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.