नववीत अनुत्तीर्ण विध्यार्थ्यांची होणार फेर परीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 03:39 PM2018-03-29T15:39:59+5:302018-03-29T15:39:59+5:30
अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.
अकोला: इयत्ता दहावीमध्ये अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेला बसण्याची संधी दिली जाते. त्याच पृष्ठभूमीवर इयत्ता नववीमध्ये अनुत्तीर्ण होणाºया विद्यार्थ्यांनासुद्धा पुनर्परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा जून महिन्यातील पहिल्या आठवड्यात शाळास्तरावर घेण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने घेतल्याची माहिती शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली.
दहावीतील नापास विद्यार्थ्यांना आॅक्टोबर किंवा फेब्रुवारीत परीक्षेला बसण्याची संधी मिळते; परंतु तशी संधी नववीमध्ये नापास झालेल्या विद्यार्थ्यांना नव्हती. त्यांना नववीमध्ये नापास झाल्यानंतर पुन्हा आणखी एक वर्ष त्याच वर्गात घालविल्यानंतरच दहावीत जाण्याची संधी मिळत असे. त्यात विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जायचे. त्यामुळे हा विषय शिक्षण विभागाच्या विचाराधीन होता. आता त्याला शासनाने परवानगी दिली आहे. तसेच शैक्षणिक वर्ष २0१७ व १८ पासून नववी व दहावीमधील विद्यार्थ्यांच्या गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयांच्या नैदानिक चाचण्या जुलै महिन्यात घेण्यात येणार आहेत. नैदानिक चाचण्यांच्या निकालावरून ज्या विद्यार्थ्यांना इयत्ता नववी व दहावीमध्ये उत्तीर्ण होण्यास काही अडचणी असतील, अशा विद्यार्थ्यांसाठी जलद गतीने शिक्षण पद्धतीचा वापर करून त्यांना उत्तीर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून शिक्षकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहेत. त्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान, राज्य मंडळ व विद्या प्राधिकरणामार्फत प्रशिक्षण घेण्यात येईल. यासोबतच २0१७ व १८ मध्ये माध्यमिक शाळांमध्ये शिकणाºया इयत्ता नववीमधील गरजू विद्यार्थ्यांना जलद गतीने शिक्षण पद्धतीची अंमलबजावणी केल्यानंतरही अपयश येत असेल तर त्या विद्यार्थ्यांना पुनर्परीक्षेची संधी उपलब्ध करून द्यावी, असा निर्णयच शासनाने घेतल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिली. (प्रतिनिधी)