महिलांवरील अत्याचार रोखणा-यास ‘निर्भय’ पुरस्कार!
By admin | Published: June 26, 2015 01:52 AM2015-06-26T01:52:32+5:302015-06-26T01:52:32+5:30
चंद्रकिशोर मीना यांनी दिली विविध उपक्रमांबद्दल माहिती.
अकोला : महिलांवरील अत्याचाराविरुद्ध कामगिरी करणार्या नागरिकांसाठी राज्य शासनाच्या वतीने 'निर्भय' पुरस्कार देण्यात येणार आहे. त्या अनुषांगाने जिल्ह्यातील नागरिकांनी महिलांवर होणार्या अत्याचाराविरुद्ध लढा देऊन पोलीस प्रशासनास सहाकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलीस निरीक्षक चंद्रकिशोर मीना यांनी केले आहे. पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणार्या विविध उपक्रमांबद्दल माहिती देण्यासाठी गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी पोलीस प्रशासनातर्फे राबविण्यात येणार्या उपक्रमांची माहिती देऊन नागरिकांना आपला सहभाग वाढविण्याचे आवाहन केले. महिलांवरील अत्याचाराला आळा घालण्यासाठी शासनाने घोषित केलेल्या ह्यनिर्भयह्ण पुरस्काराविषयी यावेळी त्यांनी माहिती दिली. तसेच नागरिकांनी समोर येऊन महिलांवर होणार्या अत्याचाराविरुद्ध लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले. असे कार्य करणार्या व्यक्तीच्या नावाचा प्रस्ताव ह्यनिर्भयह्ण पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये रोख आणि प्रशस्तिप्रत्रक असे राहणार आहे. तेव्हा नागरिकांनी आपला सहभाग वाढवून महिलांवरील होणार्या अत्याचाराला शमविण्यास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मीना यांनी केले. तसेच १ जुलैपासून जिल्ह्यात 'मुस्कान' नावाचा नवीन उपक्रमदेखील पोलील प्रशासनाच्या वतीने राबविण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत शहरातील भिकारी, मार्केटमध्ये काम करणारे मुले, रेल्वे स्थानक, बस स्थानकावरील मुलांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. या उपक्रमाचा फायला मिसिंग चाईल्ड शोधण्यासाठी होणार असल्याचे मीना यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.