निर्गुणा धरण ‘ओव्हर फ्लो’; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:23 AM2021-08-24T04:23:43+5:302021-08-24T04:23:43+5:30
पातूर तालुक्यात गत तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेले ...
पातूर तालुक्यात गत तीन-चार दिवसांपासून पाऊस सुरू आहे. त्यामुळे प्रकल्पांच्या जलसाठ्यात वाढ होत आहे. तालुक्यातील सर्वात मोठे धरण असलेले निर्गूणा (चोंढी) धरण ओव्हर फ्लो झाले होते. धरणात ३९१.४०मी., २८.८५ मी.मी., शंभर टक्के जलसाठा उपलब्ध झाला. निर्गुणा पाटबंधारे परिसरात १७५ मी.मी. पाऊस झाला. दोन्ही सांडव्यावरून एक फुटाने पाणी वाहत आहे. रविवारी रात्री मालेगाव, रिसोड, मेहकर तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्गूणा धरण पूर्ण भरले आहे. धरणाच्या दोन्ही सांडव्यावरून रात्री दोन फुटांवरून पाणी वाहत होते. पाण्याची पातळी पाहता नदीकाठच्या गावांना प्रशासनातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. वाढत्या जलसाठ्याकडे पाटबंधारे विभागाचे कर्मचारी पूर्ण लक्ष ठेवून आहेत.
-------------------
धोक्याच्या पातळीपेक्षा एक फूट खोल पाणी
मालेगाव, रिसोड, मेहकर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे निर्गूना (चोंढी) धरण ओव्हर फ्लो होऊन वाहत होते. रविवारी रात्रीच्या सुमारास धोक्याच्या पातळीपेक्षा केवळ एका फूट खाली पाणी होते. त्यामुळे चोंढी येथील ग्रामस्थांची तारांबळ उडाली होती.
--------------------
काटेपूर्णा प्रकल्पाचे पुन्हा दोन दरवाजे उघडले
जिल्ह्यात गत तीन-चार दिवसांपासून सतत पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये वाढ होत आहे. शुक्रवारी धरणाचे दोन वक्रद्वार उघडण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा सोमवार, दि.२३ ऑगस्ट रोजी सायंकाळ ७ वाजताच्या सुमारास काटेपूर्णा प्रकल्पाचे दोन वक्रद्वार ३० सें.मी उंचीने उघडण्यात आले आहेत.यामधून नदीपात्रात ५०.१६ घ.मी./सें एवढा विसर्ग सोडण्यात येत आहे. नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.