निर्मला डाबेराव यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:14 AM2021-07-18T04:14:56+5:302021-07-18T04:14:56+5:30
अंदुरा : निर्मला सहदेव डाबेराव (६५) यांचे दि.१७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून ...
अंदुरा : निर्मला सहदेव डाबेराव (६५) यांचे दि.१७ जुलै रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुली, सून नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. कोतवाल राजेश डाबेराव यांच्या त्या मातोश्री होत.
---------------------
जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक
बार्शिटाकळी : जमीन मिळवून देण्याचे आमिष दाखवून बौद्ध भिक्खूकडून २.५० लाख रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात दिलेल्या फिर्यादीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी पाच अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला.
बार्शीटाकळी-महान रस्त्यावरील वॉटर सप्लाय परिसरात जमीन मिळवून देतो, असे आमिष दाखवून यवतमाळ जिल्ह्यातील तारोड येथील ५५ वर्षीय भदन्त आनंद बोधी यांची अज्ञात पाच जणांनी फसवणूक करून दोन लाख ५० हजार रुपये रोख व सात हजार रुपये किमतीचा मोबाईल घेऊन पळ काढल्याची घटना दि. १६ जुलै रोजी उघडकीस आली. फसवणूक झाल्याचे कळताच बौद्ध भिक्खूंनी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. त्यावरून पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता अज्ञात पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. व सर्व रस्त्यांची नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेतला. परंतु आरोपी पसार होण्यात यशस्वी झाले. पुढील तपास बार्शीटाकळी पोलीस करीत आहेत.
---------------------------------------
गळफास घेऊन शेतकऱ्यांची आत्महत्या!
बार्शिटाकळी : तालुक्यातील निंबी( चेलका) येथील शेतकऱ्याने राहते घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १७ जुलै रोजी घडली. जगदेव नंदू करवते (७२) असे मृतक शेतकऱ्याचे नाव असून त्यांचेकडे पाच एकर शेती आहे.
शेतात होणारी नापिकी व कर्जाचा बोजा या चिंतेत ते नेहमी राहत होते. मृतक शेतकऱ्याच्या नावे बँकेचे कर्ज असून, इतरही खासगी कर्ज असल्याचे समजते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला .मृतकाचे पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे व आप्तपरिवार आहे. महसूल विभागाचे तलाठी यांनी घटनेच्या माहितीचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविला आहे.