महापालिकेची शाळा झाली लोकसहभागातून डिजिटल
By admin | Published: April 19, 2017 01:44 AM2017-04-19T01:44:21+5:302017-04-19T01:44:21+5:30
अकोला : जुने शहरातील शिव नगरातील अकोला मनपाची शाळा क्र. १७ मंगळवारी लोकसहभागातून डिजिटल झाली. ज्या लोकांनी सढळ हस्ते या शाळेच्या उभारणीसाठी मदत केली.
सत्काराच्या उतराईने झाला लोकार्पण सोहळा
अकोला : जुने शहरातील शिव नगरातील अकोला मनपाची शाळा क्र. १७ मंगळवारी लोकसहभागातून डिजिटल झाली. ज्या लोकांनी सढळ हस्ते या शाळेच्या उभारणीसाठी मदत केली, त्या दानशूर २० जणांच्या सत्काराच्या उत्तराईने हा लोकार्पण सोहळा साजरा झाला. या लोकार्पण सोहळ्यास महापौर विजय अग्रवाल आणि उपायुक्त समाधान सोळंके, मंजूषा शेळके, अनिल गरड, सतीश ढगे, शाहीन सुलताना आदी नगरसेवक येथे प्रामुख्याने उपस्थित होते.
रामदासपेठेतील मनपा शाळेच्या मुख्याध्यापिका कोकिळा काकडे यांची बदली काही महिन्यांआधीच शिव नगरातील मनपा शाळा क्र. १७ मध्ये झाली होती. इयत्ता आठवीपर्यंत असलेल्या या शाळेची पटसंख्या शेकडोच्या घरात असताना येथील व्यवस्था सुसज्ज नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. काकडे यांनी पुढाकार घेऊन मदतीसाठी आवाहन केले. कुणी प्रोजेक्टर, कुणी हॉलसाठी मदत, कुणी साऊंड सीस्टिम अशी जबाबदारी उचलली आणि अल्पावधीतच शाळा संपूर्णपणे अत्याधुनिक डिजिटल झाली. शाळा सुसज्ज झाल्यानंतर त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी सकाळी १० वाजता ठेवला गेला. प्रमुख अतिथींनी तब्बत तीन तास येथे घालविलेत. प्रमुख अतिथींच्या हस्ते शाळेला मदत करणाऱ्या संजय जिरापुरे, तुषार भिरड, मुरलीधर वानखडे, रूपेश वानखडे, कैलास खेते, गणेश ठुसे, किशोर हुलकर, संजय संसारे, नितीन ताकवाले, रफीक, मंगेळ कोटवार, अजय जहागीरदार यांच्यासह २० जणांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका कोकिळा काकडे, शीला गरड, अलका नकासकर, सुनीता पाटील, प्रिया सागळे, विजय कुरस्कर, सुनीता सोळ्ंके, प्रभा शेरेकर, धरमकर व मानकर आदींनी परिश्रम घेतलेत.