घाेटाळेबाजांवर कारवाई नाहीच; लाेकप्रतिनिधींची बाेळवण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:15 AM2021-01-02T04:15:50+5:302021-01-02T04:15:50+5:30
महापालिकेतील महिला व बाल कल्याण तसेच शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महिला व बाल ...
महापालिकेतील महिला व बाल कल्याण तसेच शिक्षण विभागातील भ्रष्ट प्रवृत्तींमुळे प्रशासनाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. महिला व बाल कल्याण विभागामार्फत मनपातील शालेय विद्यार्थ्यांसाठी खरेदी केल्या जाणाऱ्या सायकल प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महिला बचतगटांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमावर आर्थिक उधळपट्टी झाल्यामुळे हे प्रकरण वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या दोन्ही विषयांत मनपा प्रशासनाने संबंधित विभागातील प्रमुखांवर कारवाई न करता बदलीचा साेईस्कर मार्ग निवडला आहे. सायकल खरेदी प्रकरणात मनपा शिक्षणाधिकाऱ्यांसह २८ मुख्याध्यापक तसेच सायकलसाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे जबाब नोंदविले आहेत. या दोन्ही प्रकरणांतील चौकशी अहवाल उपायुक्त पूनम कळंबे यांनी आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे सादर केल्यानंतर प्रशासनाने शिक्षण विभाग तसेच महिला व बाल कल्याण विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना नाेटीस जारी केल्यामुळे प्रशासन दाेषींची पाठराखण करीत असल्याचे दिसत आहे.
जलप्रदाय विभागाचा माेह साेडवेना!
सायकल खरेदी व हळदी-कुंकू प्रकरणात जलप्रदाय विभागातील महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे. मनपा आयुक्तांनी संबंधितांवर ठाेस कारवाई न करता बदलीचा साेईस्कर पर्याय निवडला. जलप्रदाय विभागाला टक्केवारीची लागलेली कीड लक्षात घेता या विभागाचा माेह संबंधितांना साेडवत नसल्याचे समाेर आले. ही बाब आयुक्तांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी महिला कर्मचाऱ्याला सक्त ताकीद दिल्याची माहिती आहे.
कारवाईला विलंब का?
दाेन्ही प्रकरणांत कारवाईचा अहवाल आयुक्त संजय कापडणीस यांच्याकडे प्रलंबित आहे. तरीही दाेषी अधिकारी,कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यास विलंब केला जात आहे. कारवाई न करण्यासाठी मनपातील काही पदाधिकाऱ्यांकडून दिशानिर्देश दिले जात असल्याची माहिती आहे.