‘पीएम’आवासचा लाभ नाहीच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2021 04:21 AM2021-09-11T04:21:13+5:302021-09-11T04:21:13+5:30
पंचायत समितीसमाेर वाहतूक विस्कळीत अकाेला : पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या दाेन्ही कार्यालयात विविध ...
पंचायत समितीसमाेर वाहतूक विस्कळीत
अकाेला : पंचायत समिती ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्ग अत्यंत वर्दळीचा आहे. या दाेन्ही कार्यालयात विविध कामासाठी येणाऱ्या नागरिकांची गर्दी राहते. पंचायत समिती ते मनपाच्या अग्निशमन विभाग कार्यालयापर्यंत रस्त्यावर दाेन्ही बाजूने दुचाकी वाहने उभी केली जात आहेत. यामुळे वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत असून, या समस्येकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.
सिग्नल व्यवस्था उभारा!
अकाेला : शहरातील वाशिम बायपास चाैकात सिग्नल व्यवस्था नसल्यामुळे वाहतुकीची काेंडी हाेत आहे. या चाैकातून वाशिम, बाळापूर, खामगाव, मेहकर आदी गावांना जाण्याचा प्रमुख मार्ग आहे. त्यामुळे चाैकात जड वाहनांसह प्रवासी वाहतुकीची माेठी वर्दळ राहते. याठिकाणी तातडीने सिग्नल व्यवस्था उभारण्याची मागणी निवेदनाद्वारे वाहतूक शाखेकडे करण्यात आली आहे.
पाेलीस ठाण्यासमाेर घाणीचे साम्राज्य
अकाेला : मनपातील स्वच्छता विभागाच्या दुर्लक्षामुळे अकाेटफैल पाेलीस ठाण्यासमाेर चाैकातील मुख्य नाला घाणीने व कचऱ्याने तुडुंब साचला आहे. यामुळे परिसरातील व्यावसायिक, रहिवासी त्रस्त झाले आहेत. नाल्याची तातडीने साफसफाइ करण्याची गरज असून यासंदर्भात व्यावसायिकांनी मनपाकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
खड्ड्यामुळे अपघाताची शक्यता
अकाेला: पश्चिम झाेनमधील कस्तुरबा गांधी रुग्णालय चाैकात एसबीआय बॅंकेलगत जलवाहिनीसाठी खाेदकाम करण्यात आले आहे. मागील चार दिवसांपासून हा खड्डा जैसे थे असल्यामुळे डाबकी राेडवरून मार्गाक्रमण करणाऱ्या वाहनचालकांच्या जीवाला धाेका निर्माण झाला आहे. या प्रकाराकडे झाेन अधिकारी व प्रभाग क्रमांक ९ मधील नगरसेवकांचे दुर्लक्ष नागरिकांच्या जीवावर उठले आहे.
आराेग्य निरीक्षक सुस्तावले
अकाेला : शहराच्या कानाकाेपऱ्यात हाेणाऱ्या साफसफाइच्या कामांवर देखरेख ठेवण्यासाठी मनपा प्रशासनाने स्वच्छता व आराेग्य विभागात आराेग्य निरीक्षकांची नियुक्ती केली आहे. सफाइ कर्मचाऱ्यांना काेणत्याही सूचना दिल्या जात नसल्याने शहरात ठिकठिकाणी घाण साचल्याचे दिसत आहे. ऐन सणासुदीच्या दिवसांत शहरात घाण व कचऱ्याचे ढीग दिसून येत असल्याने आराेग्य निरीक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
अकाेलेकरांनाे चाचणीसाठी पुढाकार घ्या!
अकाेला : वातावरणातील बदलामुळे अकाेलेकरांना सर्दी, खाेकला, अंगदुखी आदी संसर्गजन्य आजारांनी बेजार करून साेडले आहे. शहरात विविध आजारांची साथ पसरली असताना नागरिक याकडे दुर्लक्ष करीत आहेत. काेराेनाची लक्षणे व साध्या सर्दीच्या लक्षणांमध्ये साम्य असल्याने नागरिकांनी घाबरून न जाता काेराेना चाचणीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.