बायोमेट्रिक मशीनच नाहीत; कर्जमाफीचे अर्ज भरणार कसे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2017 03:06 AM2017-08-02T03:06:11+5:302017-08-02T03:09:37+5:30

अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फत ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन’ उपलब्ध नसल्याने, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरणार कसे, असा प्रश्न जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांपुढे निर्माण झाला आहे.

No biometric machines; How to apply for a loan application? | बायोमेट्रिक मशीनच नाहीत; कर्जमाफीचे अर्ज भरणार कसे?

बायोमेट्रिक मशीनच नाहीत; कर्जमाफीचे अर्ज भरणार कसे?

googlenewsNext
ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील महा ई-सेवा केंद्रांपुढे समस्या थकबाकीदार शेतकर्‍यांकडून भरून घेण्यात येत आहेत ‘ऑनलाइन’ अर्जबायोमेट्रिक मशीन केव्हा उपलब्ध होणार असा प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांकडून ‘आपले सरकार’ पोर्टलवर जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांमार्फत ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्यात येत आहेत; परंतु ऑनलाइन अर्ज भरताना आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) नसलेल्या शेतकर्‍यांचे अर्ज भरण्यासाठी ‘बायोमेट्रिक मशीन’ उपलब्ध नसल्याने, कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरणार कसे, असा प्रश्न जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांपुढे निर्माण झाला आहे.
 सन २00९ ते ३0 जून २0१६ पर्यंत थकबाकीदार  शेतकर्‍यांसाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी शासनामार्फत जाहीर करण्यात आली आहे. कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत थकबाकीदार शेतकर्‍यांना कर्जमाफी तसेच कर्जाची नियमित परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर अनुदान आणि कर्जाचे पुनर्गठन करण्यात आलेल्या शेतकर्‍यांना विशेष योजनेचा लाभ देण्यासाठी, संबंधित शेतकर्‍यांकडून ‘ऑनलाइन’ अर्ज भरून घेण्याची प्रक्रिया २४ जुलैपासून जिल्हय़ात सुरू करण्यात आली. महा ई-सेवा केंद्र, ग्रामपंचायतींचे आपले सरकार सेवा केंद्र आणि कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएससी) केंद्रांमार्फत शेतकर्‍यांचे ‘ऑनलाइन’ अर्ज शासनाच्या ‘आपले सरकार’ या संकेतस्थळावर भरून घेण्यात येत आहेत. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरताना शेतकर्‍यांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत संलग्नित (लिंक) असणे आवश्यक आहे; परंतु अनेक शेतकर्‍यांचा आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी ‘लिंक’ नसल्याने, ऑनलाइन अर्ज भरताना अडचणी येत आहेत. आधार क्रमांक मोबाइल क्रमांकासोबत लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी बायोमेट्रिक मशीन आवश्यक आहेत; परंतु जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर शासनामार्फत अद्याप बायोमेट्रिक मशीन उपलब्ध झाल्या नाही. त्यामुळे आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर बायोमेट्रिक मशीन केव्हा उपलब्ध होणार, असा प्रश्न महा ई-सेवा केंद्रांच्या संचालकांसमोर निर्माण झाला आहे.

जिल्हय़ातील महा ई-सेवा केंद्रांवर शासनाकडून बायोमेट्रिक मशीन उपलब्ध होणार आहेत. मशीन उपलब्ध झाल्यानंतर आधार क्रमांक मोबाइल क्रमांकाशी लिंक नसलेल्या शेतकर्‍यांचे कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज भरून घेण्याच्या कामाला गती येणार आहे.
-सागर भुतडा, जिल्हा समन्वयक, महाऑनलाईन
 

Web Title: No biometric machines; How to apply for a loan application?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.