निळ्या रंगाच्या बर्फ निर्मितीस अकोल्यातील कारखानदारांचा खो!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:54 PM2018-05-16T14:54:58+5:302018-05-16T14:54:58+5:30
अकोल्यातील कारखानदार निळ्या रंगाचा बर्फ तयार करण्यास कानाडोळा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उजेडात आले आहे.
- सचिन राऊत
अकोला -मृतदेहांसाठी किंवा औद्यागिक वापरासाठी लागणाºया बर्फाची खाद्य बर्फ म्हणून विक्री करण्यात येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी अखाद्य बर्फ निळ्या रंगात तयार करण्याचे आदेश दिल्यानंतरही अकोल्यातील कारखानदार निळ्या रंगाचा बर्फ तयार करण्यास कानाडोळा करीत असल्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने मंगळवारी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये उजेडात आले आहे.
अन्न सुरक्षा व मानदे कायद्यानुसार बर्फ हे खाद्यपदार्थाच्या परिभाषेत येत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या राज्यआयुक्तांनी यासाठी एक नियमावली तयार केली आहे. औद्यागिक किंवा मृतदेहांसाठी वापरण्यात येणाºया बर्फाची पुन्हा खाद्यपदार्थांसाठी विक्री करण्यात येत असल्याचे राज्यभरात उघडकीस आले होते. त्यामुळे आरोग्यासाठी घातक असलेला या अखाद्य बफर् ाची विक्री होऊ नये म्हणून अशा प्रकारचा बर्फ निळ्या रंगात तयार करण्याचे आदेश दिले आहेत, तर खाद्यासाठी वापरण्यात येत असलेला बर्फ पांढºया रंगात निर्मिती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यासाठी बर्फ उत्पादकांना अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवानाही बंधनकारक करण्यात आला आहे; मात्र त्यानंतरही बर्फ उत्पादकांनी निळ्या बर्फाची निर्मितीच सुरू केली नसल्याची माहिती लोकमतने केलेल्या पाहणीत समोर आली आहे. एवढेच नव्हे, तर बर्फ कारखानदारांनी अन्न व औषध विभागाच्या परवान्यासाठीही पुढाकार न घेतल्याची खात्रीलायक माहिती आहे.
निळ्या रंगाची बर्फ निर्मिती न केल्यास ही शिक्षा
बर्फ उत्पादकांनी औद्यागिक वापरासाठी लागणाºया निळ्या रंगाचा बर्फ उत्पादीत न केल्यास तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचा परवाना न घेतल्यास बर्फ उत्पादकांना पाच लाखांचा दंड व सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे; मात्र त्यानंतरही अकोल्यातील बर्फ उत्पादकांपैकी एकानेच परवान्यासाठी प्रक्रिया सुरू केल्याची माहिती आहे. तर एकाने परवाना घेतल्याचे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाºयांनी सांगितले.
असा झाला संवाद
एका बर्फ कारखानदारास औद्यागिक वापरासाठी लागणाºया बर्फाची मागणी केली असता, त्यांनी अशा प्रकारचा बर्फ अद्याप तयार नसून, संबंधित अधिकाºयांनी काही माहितीच दिली नसल्याचे या कारखानदारांनी सांगितले, तर पांढरा बर्फ विक्रीसाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यानंतर दुसºया बर्फ कारखानदारास मृतदेह ठेवण्यासाठी बर्फाची लादी हवी असल्याचे प्रतिनिधींनी सांगितले, यावर त्यांनी पांढºया रंगाचा बर्फ तयार असल्याचे सांगत १२०० ते १३०० रुपयांचा बर्फ लागणार असल्याचे सांगितले. ५ ते ६ रुपये प्रतिकिलोने बर्फ लागणार असल्याचेही कारखानदारांचे म्हणणे होते.