पीक कर्ज मिळेना...शेतकरी खासगी ‘फायनान्स’च्या दारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 10:12 AM2020-06-19T10:12:14+5:302020-06-19T10:12:30+5:30

कर्जमाफीचा लाभ अद्यापही हजारो शेतकऱ्यांना झाला नसल्यामुळेच या शेतकºयांना नाइलाजाने मायक्रो फायनान्स दारात जावे लागत आहे.

No crop loan ... Farmers at the door of private 'finance'! |  पीक कर्ज मिळेना...शेतकरी खासगी ‘फायनान्स’च्या दारात!

 पीक कर्ज मिळेना...शेतकरी खासगी ‘फायनान्स’च्या दारात!

googlenewsNext

- सचिन राऊत 
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या अनेक शेतकऱ्यांना अद्यापही पीक कर्ज देण्यास बँकांक डून टाळाटाळ करण्यात येत असल्याने तसेच परवानाधारक सावकार, सराफा व्यावसायिक सोने गहाण ठेवून कर्ज देण्यास नकार देत असल्याने शेतकरी आता मायक्रो फायनान्स कंपनीकडे वळल्याचे वास्तव आहे. सरकारने केलेल्या कर्जमाफीचा लाभ अद्यापही हजारो शेतकऱ्यांना झाला नसल्यामुळेच या शेतकºयांना नाइलाजाने मायक्रो फायनान्स दारात जावे लागत आहे.
शेतकºयांना सावकाराच्या जाचातून सोडण्यासाठीचे धोरण शासनाने अवलंबित त्यांना बँकांकडूनच पतपुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अशातच पीक कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात झाल्याने शेतकºयांवरील संकट दूर करण्यासाठी पीक कर्जमाफी करण्यात आली आहे; मात्र अनेक शेतकºयांना अद्यापही ही कर्जमाफी न मिळाल्याने शेतकरी पैशासाठी बँकांचे उंबरठे झिजवित आहेत. त्यातच आता पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे बी-बियाणे आणि खते तसेच पेरणीच्या खर्चासाठी शेतकºयांना तत्काळ रकमेची गरज असल्याने त्यांनी सराफांकडे धाव घेतली; मात्र सराफांना आलेल्या कटु अनुभवामुळे त्यांनीही सोने गहाण ठेवून कर्ज देण्यास नकार दिल्याने हवालदिल झालेला शेतकरी थेट मायक्रो फायनान्सकडे वळला आहे. या ठिकाणी भरमसाट व्याजासह छुपे दर लावून कर्ज पुरवठा करण्यात येत असल्याने शेतकºयांची लूट होणार असल्याचे निश्चित आहे.


लाखावर शेतकºयांना अद्यापही कर्ज नाही
जिल्ह्यातील एक लाख ४२ हजार शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे; मात्र यापैकी आतापर्यंत केवळ ३० हजार शेतकºयांनाच कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यामुळे अद्यापही एक लाखांवर शेतकºयांना पीककर्ज मिळाले नसल्याने त्यांना अवैध सावकार, प्रायव्हेट फायनान्सकडे चकरा माराव्या लागत आहेत. पेरण्या सुरू झालेल्या असतानाही शेतकºयांना पीककर्ज न मिळाल्याने त्यांना आता मिळेल त्या व्याजदरात आणि देईल त्या सावकाराकडून कर्ज घ्यावे लागत आहे.


सराफांचा या कारणामुळे नकार
सराफा व्यावसायिक शेतकºयांना त्यांचे सोने गहाण ठेवून पेरणीसाठी रक्कम देत होते. गतवर्षी गहाण असलेले सोने परत करण्याचा आदेश सरकारने घेतल्यानंतर शेकडो शेतकºयांना हे सोने परत करण्यात आले; मात्र सराफांना त्याचा मोबदला अद्यापही मिळाला नाही. यासोबतच एखाद्या वेळी चुकून चोरीचे सोने गहाण ठेवल्यास सराफांना चोरांच्या पिंजºयात उभे केले जाते, तसेच पोलिसांकडूनही त्रास देण्यात येत असल्याने सराफांनी आता शेतकºयांना सोने गहाण ठेवून कर्ज देण्यास नकार देत प्रायव्हेट फायनान्सचा रस्ता दाखविला आहे.


शेतकरी तसेच सराफांचे संबंध गत अनेक वर्षांपासूनचे आहेत. शेतकºयास तातडीची रक्कम लागल्यास त्यांना सराफांकडून अत्यंत माफक व्याजदारावर पैसे उपलब्ध करून देण्यात येतात; मात्र गत काही वर्षांमध्ये सराफांवर चोरीचे सोने घेतल्याचे मोठे आरोप झाले आहेत. त्यामुळे सोने गहाण ठेवण्याचा व्यवहार बहुतांश प्रमाणात बंद करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकºयांना आता पेरणीची सोय करण्यासाठी खासगी सावकार तसेच इतर पर्याय शोधावे लागत आहेत.
- शैलेश खरोटे, सराफा

Web Title: No crop loan ... Farmers at the door of private 'finance'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.