‘दीड वर्षात विकास निधी नाही ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:14 AM2021-04-03T04:14:58+5:302021-04-03T04:14:58+5:30

भाजप स्थापना दिनानिमित्त ध्वजवाटप अकोला : भारतीय जनता पक्षाने अकोला जिल्ह्यात पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सात हजार कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी पक्षाचा ...

'No development fund in a year and a half' | ‘दीड वर्षात विकास निधी नाही ’

‘दीड वर्षात विकास निधी नाही ’

googlenewsNext

भाजप स्थापना दिनानिमित्त ध्वजवाटप

अकोला : भारतीय जनता पक्षाने अकोला जिल्ह्यात पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त सात हजार कार्यकर्त्यांच्या निवासस्थानी पक्षाचा ध्वज तसेच पक्षाच्या दैनंदिन कामकाजासाठी आपण आपले योगदान समर्पण निधी वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती पक्षाचे सरचिटणीस माधव मानकर यांनी दिली.

बेवारस मृतदेहावर केले अंत्यसंस्कार

अकाेला : सिव्हील लाईन पोलीस स्थानक हद्दीतील साठ वर्षीय बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार करून प्रबुद्ध भारत बहुउद्देशीय संस्थेने मानवतेचे उदाहरण दिले आहे. यावेळी संस्थाध्यक्ष महेंद्र डोंगरे, नागेश बागडे, चंद्रशेखर नकाशे, सचिन भीमकर, मारुती वाल्मीक, सिद्धू डोंगरे, अक्षय डहाके, कृष्णा नंदागवळी, आदी उपस्थित होते.

दिव्‍यांगांनी हयात प्रमाणपत्र सादर करावे

अकोला : महानगरपालिका क्षेत्रातील ज्‍या दिव्‍यांगांना महानगरपालिकेमार्फत उदरनिर्वाह भत्‍ता सुरू आहे, अशा सर्व दिव्‍यांगांनी १ मार्च ते ३१ मार्चपर्यंतचे हयात प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्‍यात आले आहे.

आरडीजीमध्ये सुगम संगीत स्पर्धा

अकाेला : स्थानिक राधादेवी गाेयनका महाविद्यालय व आरडीजी ॲकॅडमी ऑफ परफार्मिंग आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने खुली सुगम संगीत स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये दीक्षा धनगर खैरागड हिने प्रथम, साक्षी मिश्रा हिने द्वितीय, शांभवी खरे अकाेला हिने तृतीय क्रमांक मिळवला.

‘त्या’ शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी द्या

अकाेला : गणित व विज्ञान शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी देण्याची मागणी शिक्षक परिषदेने केली आहे. याविषयी परिषदेकडून प्रकाश चतरकर, माे. वसिमाेद्दीन, दत्तात्रय साेनाेने, सविता खेतकर यांनी निवेदन दिले.

सिंधी पंचायतीकडून काेविड शिबिर

अकाेला : काेराेनाचा वाढता उद्रेक लक्षात घेत, पूज्य सिंधी जनरल पंचायतीने काेविड चाचणी शिबिर आयाेजित केले हाेते. यावेळी अध्यक्ष कन्हैयालाल रंगवानी, काेडुमल चावला, हरिश पारवानी, अशाेक बाेधानी आदी उपस्थित हाेते.

शिवरायांना अभिवादन

अकाेला : शिवसेना अकोला जिल्हा कार्यालय येथे शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना अकोला शहरप्रमुख (पूर्व) अतुल पवनीकर, उपशहरप्रमुख योगेश अग्रवाल, नंदकिशोर ढाकरे, शहर सचिव अविनाश मोरे, महिला अकोला शहर संघटिका वर्षाताई पिसोडे, प्रा. प्रकाश डवले, अविनाश कोकरे, सचिन चावरे, मंगेश खंडेझोड, रवी घाटोळे, राम गावंडे आदी उपस्थित होते. मोठी उमरी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक भाऊसाहेब कपले, नगरसेवक मंगेश काळे, ज्येष्ठ शिवसैनिक तायवाडे काका, सतीश मानकर, केशव मुळे उपस्थित होते.

Web Title: 'No development fund in a year and a half'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.