शेतकऱ्यांनी पैसे भरूनही तीन वर्षांपासून वीज जोडणी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:19 AM2021-04-09T04:19:18+5:302021-04-09T04:19:18+5:30
शेतकरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असताना सुध्दा जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.नैसर्गिक ...
शेतकरी अर्थव्यवस्थेचा मुख्य घटक असताना सुध्दा जाणिवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष केल्या जाते. सध्याच्या परिस्थितीत शेतकरी अत्यंत हलाखीचे जीवन जगत आहे.नैसर्गिक आपत्ती व सतत होणाऱ्या नापिकीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. एकीकडे सरकार मागेल त्या शेतकऱ्यांना शेतीकरिता वीज तात्काळ उपलब्ध करून देण्याची घोषणा करते. परंतु दुसरीकडे शेतकऱ्यांनी पैसे भरूनही तीनवर्षाचा कालावधी होऊनही शेतामध्ये वीज जोडणी दिली जात नाही. शेतकऱ्यांनी तीन वर्षांपासून शेतात बोअर व विहिरी खोदून ठेवल्या आहेत. परंतु त्यांच्या शेतात वीज पुरवठा नसल्याने ते पिकांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी देण्यात यावी. अशी मागणी निवेदन मराठा महासंघ शाखा मूर्तिजापूरने केली. अन्यथा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष अरविंद कोकाटे, उपाध्यक्ष हरीभाऊ वानखडे, शहराध्यक्ष शरद हजबे, विवेक शिंदे, दीपक बनारसे, पत्रकार विलास नसले, अरूण लिंगाडे, मुन्ना नाईकनवरे, नगरसेवक सचिन देशमुख, सुनील भुईकर, जय मोहिते, शाम येवले,राजु काळे, मनोज तायडे, विश्वास राऊत, आशिष कोकाटे, निवृत्ती कान्हेरकर, राजु शेगावकर, संतोष टरले, सचिन शिंदे, अविनाश भिसे उपस्थित होते.