ना अपघाताची भीती ना दंडाची, दुचाकी चालवितांना माेबाइलवर बाेलणारे वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:19 AM2020-12-31T04:19:18+5:302020-12-31T04:19:18+5:30
अकाेला : शहरासह जिल्ह्यात बहुतांश अपघातांचे प्रमुख कारण वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणे असल्याचे समाेर आले आहे. मात्र तरीही दुचाकी ...
अकाेला : शहरासह जिल्ह्यात बहुतांश अपघातांचे प्रमुख कारण वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणे असल्याचे समाेर आले आहे. मात्र तरीही दुचाकी किंवा कारसारखे वाहन चालविताना माेबाइलचा सर्रास वापर करण्यात येत आहे. वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या विभागातील पाेलिसांनी गत जानेवारी ते नाेव्हेंबरपर्यंत एक हजार ५२५ जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून सुमारे एक लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला. मात्र तरीही ना अपघाताची भीती ना दंडाची, दुचाकी चालवितांना माेबाइलवर बाेलणाऱ्यांची संख्या वाढतच आहे.
शहरातीलच रस्त्यांवर नव्हे तर राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गावर दुचाकी व कार चालविताना माेबाइलचा उपयाेग वाहनचालक करीत असल्याचे चित्र आहे. अशा वाहनचालकांवर वाहतूक शाखेकडून कारवाया करण्यात येत आहेत. मात्र तरीही वाहन चालिवताना माेबाइलचा वापर सर्रास करण्यात येत असून वाहनचालक दंड व अपघातालाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. वर्षभरात माेठ्या प्रमाणात कारवाया केल्यानंतरही अशा वाहनचालकांचे प्रमाण वाढतेच आहे. त्यामुळे पाेलीस कारवाईकडेही वाहनचालक दुर्लक्ष करीत आहेत.
२५ जानेवारी ते नाेव्हेंबर २०२० या ११ महिन्यात माेबाइलवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली
१०१८ २०१९ या एका वर्षात माेबाइलवर बाेलणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली
दंड काय
माेबाइलवर बाेलताना वाहन चालिवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखा सज्ज आहे. त्यामुळे एका वर्षात तब्बल एक हजार ५२५ कारवाया करून एक लाख ६६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ३०० रुपये ते ५०० रुपयांचा दंड वाहनचालकांना आकारण्यात आला आहे.
अपघात हाेण्याचे प्रमुख कारण म्हणजेच वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणे हे आहे. वाहन चालविताना माेबाइलवर बाेलणाऱ्यांवर धडक कारवाई वाहतूक शाखेकडून करण्यात आलेल्या आहेत. एक हजारावर कारवाया करण्यात आल्या असून तरीही वाहनचालक सुसाट असल्याचे चित्र आहे. स्वत:चा व कुटुंबीयांचा विचार करीत वाहन चालिवताना माेबाइलवर बाेलणे टाळावे.
गजानन शेळके, प्रमुख वाहतूक शाखा, अकाेला