तीन महिन्यांपासून श्रावण बाळ व संजय गांधी निराधार लाभार्थ्यांना मानधन नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:22 AM2021-09-24T04:22:44+5:302021-09-24T04:22:44+5:30
बाळापूर तहसील अंतर्गत ग्रामीण भागांमधील हाता, अंदुरा, कारंजा, डोंगरगाव, बोरगाव वैराळे, निंबा, निंबी, बहादूरा या परिसरातील शेकडो नागरिकांना श्रावण ...
बाळापूर तहसील अंतर्गत ग्रामीण भागांमधील हाता, अंदुरा, कारंजा, डोंगरगाव, बोरगाव वैराळे, निंबा, निंबी, बहादूरा या परिसरातील शेकडो नागरिकांना श्रावण बाळ व संजय गांधी निराधार योजनेंतर्गंत मानधन देण्यात येते. या मानधनावरच त्यांचा उदरनिर्वाह चालतो. त्यांना दुसरा कोणताच आधार नसल्यामुळे प्रत्येक महिन्याकाठी या लाभार्थ्यांना दरमहा एक हजार रुपये मानधन दिले जाते. परंतु बाळापूरचे नव्याने आलेले नायब तहसीलदार पाचपोहे यांच्याकडून अद्यापपर्यंत हालचाली दिसत नाही. नायब तहसीलदार त्यांना विचारले असता, त्यांनी एससी, एसटी प्रवर्गातील लाभार्थ्यांचे मानधन आले आहे. परंतु जनरल व ओबीसी लाभार्थ्यांचे मानधन अद्यापपर्यंत आले नसल्यामुळे मानधन देण्यास विलंब होत आहे संबधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन लाभार्थ्यांचे मानधन तात्काळ द्यावे. अशी मागणी होत आहे.