कचरा उचलण्यासाठी मजूर सापडेना; पुरवठादाराने केले हात वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:23 AM2021-09-14T04:23:38+5:302021-09-14T04:23:38+5:30

मनपात आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच निमा अराेरा यांनी कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी अनेक प्रयाेग केल्याचे दिसून आले. सुरुवातीला पडीक वार्ड ...

No laborers were found to pick up the garbage; On hand done by the supplier | कचरा उचलण्यासाठी मजूर सापडेना; पुरवठादाराने केले हात वर

कचरा उचलण्यासाठी मजूर सापडेना; पुरवठादाराने केले हात वर

Next

मनपात आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यापासूनच निमा अराेरा यांनी कचऱ्याची समस्या निकाली काढण्यासाठी अनेक प्रयाेग केल्याचे दिसून आले. सुरुवातीला पडीक वार्ड बंद करून त्याठिकाणी आस्थापनेवरील सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. मनपाकडून नियमित वेतन प्राप्त हाेत असल्याने सफाई कर्मचारी संघटनेने नाराजीने का असेेना, प्रशासनाचा निर्णय मान्य केला. कंत्राटी तत्त्वावरील आराेग्य निरीक्षकांना घरचा रस्ता दाखवल्यावर सर्वपक्षीय नगरसेवकांनी निर्माण केलेला गहजब नंतर शांत झाला. आता नुकताच कचरा संकलन करणारे ३२ ट्रॅक्टर अचानक बंद केले. या निर्णयामुळे शहरातील कचऱ्याच्या समस्येत अधिकच भर पडली. ही बाब उशिरा का हाेईना, आयुक्त अराेरा यांच्या ध्यानात आल्यानंतर कचरा उचलण्यासाठी मजुरांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी संबंधित मजूर पुरवठादारासाेबत चर्चाही पार पडली. अचानक काेठे माशी शिंकली देव जाणे, या पुरवठादाराने मजूर उपलब्ध करुन देण्यास असमर्थता दाखवल्याची माहिती आहे. याविषयावर १४ सप्टेंबर राेजी आयाेजित केलेल्या स्थायी समितीमध्ये चर्चा हाेण्याची शक्यता आहे.

आयुक्तांसमाेर फक्त ‘हाे, हाे’!

कचऱ्याच्या मुद्यावर निमा अराेरा यांच्याकडून नेहमीच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांसह झाेन अधिकाऱ्यांची बैठक आयाेजित केली जाते. या बैठकीत संभाव्य उपाययाेजना करत असताना काही अडचणी निर्माण हाेत असतील तर त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांनी तसे स्पष्टपणे नमूद करणे अपेक्षित आहे. तसे न करता आयुक्तांसमाेर ‘हाे,हाे’ करण्याची भूमिका काही अधिकारी वठवित असल्याची माहिती आहे.

पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार कामकाज

आयुक्तांची काेंडी करण्याच्या उद्देशातून काही पदाधिकारी झाेन अधिकारी तसेच बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना सतत सूचना,निर्देश देत असतात. मनपात नाेकरी करावी लागते, त्यामुळे नाराजी नकाे, या विचारातून काही अधिकारी निर्देशांचे पालन करतात.

Web Title: No laborers were found to pick up the garbage; On hand done by the supplier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.