शासकीय कार्यालयांमध्ये नो मास्क-नो एण्ट्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 09:18 AM2020-09-25T09:18:11+5:302020-09-25T09:18:19+5:30

मास्कचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

No mask-no entry in government offices! | शासकीय कार्यालयांमध्ये नो मास्क-नो एण्ट्री!

शासकीय कार्यालयांमध्ये नो मास्क-नो एण्ट्री!

googlenewsNext

अकोला : कोरोना विषाणू संसर्गाच्या पृष्ठभूमिवर शासकीय कार्यालयांमध्ये कामांसाठी येणाºया नागरिकांसाठी मास्कचा वापर आवश्यक करून,   नो मास्क -नो एण्ट्री  पद्धतीचा वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी गुरुवारी जिल्ह्यातील शासकीय कार्यालयांच्या प्रमुखांना दिले.
जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी गेल्या पाच महिन्यांपासून संबंधित सर्वच यंत्रणांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत; परंतु जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रित करण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

 पीडीकेव्ही च्या कोविड सेंटरमध्ये आणखी २००  आॅक्सिजन बेड 
कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रुग्णांवर उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातील केअर सेंटरमध्ये आणखी २०० ह्यआॅक्सिजन बेडह्णची व्यवस्था करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी म्हटले आहे.

Web Title: No mask-no entry in government offices!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.