दिलासादायक : शनिवारी एकही पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 07:57 PM2021-07-17T19:57:30+5:302021-07-17T19:57:38+5:30
No positive patient was recorded in Akola : कोविडचा एकही अहवाल पॉझिटिव्ह न आल्याची ही पहिलीच वेळ आहे.
अकाेला: जिल्ह्यात कोविडचा शिरकाव होवून सुमारे १५ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला. या दरम्यान कोविडचा एकही अहवाल पॉझिटिव्ह न आल्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे अकोलेकरांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे, मात्र जिल्ह्यात ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या अजूनही ४५ वर असल्याने थोडीशी बेफिकरीही घातक ठरू शकते.
जुलै महिन्यात नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त होत गेली. शनिवारी पहिल्यांदाच जिल्ह्यात एकही अहवाल पॉझिटिव्ह आला नाही. मागील १५ महिन्यांत असं पहिल्यांदाच घडले आहे. शनिवारी दोघांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात केवळ ४५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.