एसी, पॅकबंद शिवशाही बस नको रे बाबा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 10:42 AM2021-03-31T10:42:25+5:302021-03-31T10:42:51+5:30

No responce to Shivshahi bus : प्रवाशांकडून एसी, पॅकबंद शिवशाही बसने प्रवास करणे टाळले जात आहे.

No responce to Shivshahi bus | एसी, पॅकबंद शिवशाही बस नको रे बाबा!

एसी, पॅकबंद शिवशाही बस नको रे बाबा!

googlenewsNext

अकोला : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना बाहेरगावी प्रवास करणाऱ्यांची संख्या घटली आहे. कोरोनावाढीसाठी एसी यंत्रणा अधिक घातक ठरू शकते. त्यामुळे प्रवाशांकडून एसी, पॅकबंद शिवशाही बसने प्रवास करणे टाळले जात आहे. या बसना अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे महामंडळाकडून सांगण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाने खासगी बसला पर्याय म्हणून अद्ययावत सुविधा असणाऱ्या शिवशाही बस आगारात आणल्या. एसी, पॅकबंद बसना प्रवाशांची चांगली पसंती आहे. लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी एसी बस अधिक प्रमाणात वापरल्या जातात. जिल्ह्यातील आगारांमधून २८ बस सोडण्यात येतात. मात्र, आता कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिक बाहेरगावी प्रवास टाळत आहे. शिवशाही बस या पॅकबंद, एसी असल्याने या बसना पाहिजे त्या प्रमाणात प्रतिसाद मिळत नाही. परिणामी, एसटी महामंडळाने फेऱ्यांची संख्या कमी केली आहे. प्रवासी संख्या घटल्याने याचा परिणाम आर्थिक फायद्यावर होत आहे.

 

जिल्ह्यातील शिवशाही बसची संख्या

२८

सध्या सुरू असलेल्या शिवशाही

१८ ते २०

 

पुणे मार्गावर गाड्या रिकाम्या

प्रवाशांकडून शिवशाहीसह रातराणी गाड्यांनादेखील प्रतिसाद मिळत नाही. मुंबई, पुणे येथे जाणाऱ्यांची संख्या घटली आहे. त्यामुळे काही बस थांबविण्यात आल्या आहेत. पुणे मार्गावर गाड्या रिकाम्या जात आहेत.

 

तीन महिन्यांत शिवशाहीचे उत्पन्न घटले

कोरोनामुळे महामंडळाचे आर्थिक गणित बिघडले आहे. खासगी प्रवासी गाड्यांना प्रतिस्पर्धी म्हणून सुरू केलेल्या शिवशाही बसचे तीन महिन्यांत उत्पन्न घटले आहे. जिल्ह्यात केवळ १८ ते २० गाड्या विविध मार्गांवर सुरू आहेत.

 

मुंबई मार्गावर फेऱ्या घटल्या

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संख्या सर्वच ठिकाणी कमी झाली. पूर्वी एसी, पॅकबंद शिवशाही बस प्रवाशांची पहिली पसंत राहत होती. आता प्रवासीच मिळत नसल्याने मुंबईला जाणाऱ्या फेऱ्या घटल्या आहेत. यामुळे सर्वाधिक उत्पन्न मिळवून देणारी शिवशाही बस चांगलीच खोलात चालली आहे. पुढील काळात कोरोनाबाधितांची संख्या वाढत राहिल्यास महामंडळाच्या उत्पन्नावर आणखी परिणाम होण्याची शक्यता आहे.

Web Title: No responce to Shivshahi bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.