‘नोएल’ची साक्षी, ‘प्रभात’ची ईशा चमकली
By admin | Published: June 4, 2017 05:03 AM2017-06-04T05:03:09+5:302017-06-04T05:03:09+5:30
सीबीएसई दहावीचा निकाल जाहीर : सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई)द्वारे मार्च २०१७ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शनिवारी आॅनलाइन जाहीर झाला असून, यामध्ये अकोल्यातील ह्यसीबीएसईह्ण पॅटर्नच्या सहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. वृत्त लिहिस्तोवर ह्यलोकमतह्णला प्राप्त झालेल्या माहितीनुसार, नोएल स्कूलची साक्षी दीपक तायडे ही ९८.४० गुण संपादन करून प्रथम, तर प्रभात किड्स स्कूलची ईशा आंबेकर ही ९८.२० गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय आली आहे.
सीबीएसई मंडळाद्वारे मार्च महिन्यात शालांत परीक्षा घेण्यात आली. यामध्ये अकोला शहरातील प्रभात किड्स स्कूल, नोएल स्कूल, पोद्दार स्कूल, ज्युबिली इंग्लिश हायस्कूल, एमराल्ड हाईट्स स्कूल व स्कूल आॅफ स्कॉलर्स या सहा शाळांमधील विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. सर्वच शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रभातचे ६६ विद्यार्थी, नोएलचे २८, एमराल्डचे ३३, स्कूल आॅफ स्कॉलर्सचे ३५, ज्युबिली इंग्लिश स्कूलचे १३, पोद्दार स्कूलचे १२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.
प्रभात किड्स स्कूलची सारंगा पटोकार ९७.८०, तनया इंगळे, ९७, आयुषी राठी ९५.८, आकांक्षा माहोरे ९५, परीक्षित भुस्कटे ९५ टक्के गुण घेऊन प्रावीण्य श्रेणीत आली आहेत. नोएल स्कूलचे साहिल सोळंके (९७.२० टक्के), शंतनू गायकवाड (९७ टक्के), संकेत जामनिक (९६.२० टक्के), सुनिधी केला (९६ टक्के) यांनी शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे. एमराल्ड स्कूलचे हाजी इस्माईल साबीर खान, अंजली तुपकरी, मोहम्मद अस्बा मोहम्मद साकीब शेख, योगीता बरडे, आदेश भन्साली, मानसी देशमुख आदी विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. पोद्दार स्कूलच्या धनश्री पवार, शर्वरी धारस्कर, खुशी अग्रवाल, श्रीहर्ष जोशी, मधुर भुतडा, दिशा फाफट, आयुष थाडा, वैदेही गोडा हे विद्यार्थी चमकले. ज्युबिली इंग्लिश स्कूलच्या तेजस देवर, आर्यन वाडकर, रश्मी देशपांडे, गौरी दातकर, सर्वेश राणे या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
"प्रभात"चे चार विद्यार्थी बोर्डात अव्वल
सीबीएसई परीक्षेत ह्यप्रभातह्णच्या ८० पैकी ६६ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. यापैकी ईशा आंबेकर व रितिका तापडिया या दोघी संस्कृतमध्ये बोर्डात प्रथम आल्या आहेत, तर कुणाल धोत्रे व जय दुतोंडे हे विद्यार्थी गणित विषयात बोर्डात प्रथम आले आहेत.