उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी असहकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 02:26 PM2019-02-24T14:26:26+5:302019-02-24T14:26:31+5:30
अकोला: जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याकडून सातत्याने मानसिक छळ केला जात आहे. त्यांच्या मनमानी कामकाजाला कंटाळलेल्या विस्तार अधिकाऱ्यांनी कुळकर्णी कार्यरत असेपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही कामासाठी सहकार्य करणार नसल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले.
अकोला: जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांच्याकडून सातत्याने मानसिक छळ केला जात आहे. त्यांच्या मनमानी कामकाजाला कंटाळलेल्या विस्तार अधिकाऱ्यांनी कुळकर्णी कार्यरत असेपर्यंत त्यांच्यासोबत कोणत्याही कामासाठी सहकार्य करणार नसल्याचे निवेदन महाराष्ट्र राज्य विस्तार अधिकारी संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाºयांना दिले.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुळकर्णी यांच्याकडे विस्तार अधिकाºयांच्या विविध समस्यांचे निवेदन सातत्याने दिले; मात्र त्यावर कोणताही न्याय मिळाला नाही. त्याउलट त्रास देण्याचे धोरणच त्यांनी अवलंबले. निलंबित विस्तार अधिकारी आर. के. देशमुख यांना मानसिक त्रास देण्यासाठी सातत्याने चार वेळा मुख्यालय बदलले. १५ पैकी १० महिने निर्वाह भत्ता मिळणार नाही, यासाठी हा प्रकार केला. हेतुपुरस्सर निर्वाह भत्त्यापासून वंचित ठेवले. बाळापूरचे विस्तार अधिकारी पी. व्ही. दुधे यांचे पद रिक्त असलेल्या ठिकाणी बदली करण्याचा आयुक्तांनी आदेश दिला. तो आदेश बाजूला ठेवत कुळकर्णी यांनी वस्तुस्थिती लपवत चुकीच्या पद्धतीने फाइल तयार केली. रिक्त पद नसलेल्या अकोला पंचायत समितीमध्ये आर. के. देशमुख यांचे मुख्यालय बदलून दुधे यांना पदस्थापना दिली. त्यात विभागीय आयुक्तांच्या निर्देशांची अवहेलना केली. त्यातून दोन्ही विस्तार अधिकाºयांवर अन्याय केला. हा प्रकार कुळकर्णी सातत्याने करतात. त्यामुळे कुळकर्णी जिल्हा परिषदेत कार्यरत असेपर्यंत त्यांच्या सर्व आढावा सभांवर विस्तार अधिकारी संघटना बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनात जिल्हाध्यक्ष आर. के. देशमुख, सचिव जे. टी. नागे यांनी म्हटले आहे.
- ‘सीईओं’च्या निर्देशालाही जुमानत नाहीत कुळकर्णी!
विस्तार अधिकारी संघटनेची १९ सप्टेंबर २०१ रोजी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांच्याशी बैठक पार पडली. त्यातील इतिवृत्तानुसार संबंधित विभागांनी कार्यवाही करण्याचा आदेश त्यांनी दिला. त्यावर संघटनेने कुळकर्णी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला; मात्र कुळकर्णी यांनी काहीच केले नाही. उलट संघटनेला चर्चेसाठी दिलेले पत्र सामान्य प्रशासन विभागाने दिले. चर्चेत उपस्थित नव्हतो. त्यामुळे समस्यांचे निराकरण मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन यांच्याकडूनच करून घ्या, असे उर्मट उत्तर दिल्याचेही संघटनेने निवेदनात म्हटले आहे.