कालवा नव्हे, हा आहे अकोल्यातील भूयारी मार्ग....

By Atul.jaiswal | Published: March 14, 2023 05:54 PM2023-03-14T17:54:35+5:302023-03-14T17:54:52+5:30

शहरातील गजबजलेल्या महात्मा गांधी मार्ग व मध्यवर्ती बसस्थानकासमाेरच्या चौकातील वर्दळ कमी व्हावी या हेतूने गत वर्षी बांधण्यात आलेला भूयारी मार्ग उद्घाटनापासूनच समस्यांच्या गर्तेत अडकला आहे.

Not a canal, this is a road in Akola... | कालवा नव्हे, हा आहे अकोल्यातील भूयारी मार्ग....

कालवा नव्हे, हा आहे अकोल्यातील भूयारी मार्ग....

googlenewsNext

अकोला- शहरातील गजबजलेल्या महात्मा गांधी मार्ग व मध्यवर्ती बसस्थानकासमाेरच्या चौकातील वर्दळ कमी व्हावी या हेतूने गत वर्षी बांधण्यात आलेला भूयारी मार्ग उद्घाटनापासूनच समस्यांच्या गर्तेत अडकला आहे. कधी या भूयारी मार्गाचे दिवे बंद असतात, तर कधी पाणी साचलेले असते. मंगळवारी या भूयारी मार्गात पुन्हा पाणी साचले असून, साचलेल्या पाण्यातून वाहने काढताना चालकांना अशी कसरत करावी लागत आहे.

अकोला शहरातील महात्मा गांधी मार्ग ते जनता भाजी बाजारपर्यंत  जवळपास ३०० मिटर लांबीचा भूयारी मार्ग बांधण्यात आला आहे. गतवर्षी शहरातील दोन उड्डाणपुलांसोबतच या भूयारी मार्गाचेही लोकार्पण करण्यात आले. नव्याची नवलाई म्हणून अकोलेकरांनी या भूयारी मार्गामधून येण्या-जाण्याची हौस भागवून घेतली. आता मात्र या भूयारी मार्गाची दुरवस्था झाल्याचे चित्र आहे.

प्रकाशाची व्यवस्था म्हणून बसविण्यात आलेले दिवे अनेकदा बंद असतात.  सर्व दिवे बंद असल्याने दिवसाही मोठा अंधार असतो. त्यामुळे दिवसाही या अंडरपासमधून वाहन नेण्यास भीती वाटते. झिरपणाऱ्या पाण्यामुळे भींती शेवाळल्या आहेत.  याशिवाय मोठ्या प्रमाणात अस्वच्छताही पसरलेली आहे. संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्यामुळे या भुयारी मार्गात वारंवार पाणी साचते. कायमस्वरुपी उपाययोजना न करता पाण्याचा उपसा करून मार्ग मोकळा केला जातो. गत दोन दिवसांपासून पुन्हा या भूयारी मार्गात पाणी साचले आहे. परिणामी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

Web Title: Not a canal, this is a road in Akola...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.