बनावट खत नव्हे?; राखेची मध्य प्रदेशात विक्री
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 10:52 AM2020-07-29T10:52:07+5:302020-07-29T10:54:44+5:30
कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खताचे नमुने घेतले असून प्राथमिक तपासणीत या गोणींमध्ये राख असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : स्थानिक गुन्हे शाखा तसेच डाबकी रोड पोलिसांनी अमानतपूर ताकोडा येथून सोमवारी बनावट खतांच्या २४० गोणी असलेला एक ट्रक ताब्यात घेतला होता; मात्र मंगळवारी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खताचे नमुने घेतले असून प्राथमिक तपासणीत या गोणींमध्ये राख असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोग शाळेत पाठविण्यात आले असून. या तपासणीचा अहवाल आल्यानंतर फौजदारी कारवाई करण्याची दिशा ठरणार असल्याची माहिती कृषी अधिकारी व पोलिसांनी दिली.
अमानतपूर ताकोडा येथे अनिल कुटे पाटील यांचे पाटील अॅग्रो टेक इंडिया लॅब नावाने प्रतिष्ठान आहे. या ठिकाणावरून ते पारस येथील औष्णिक वीज केंद्रातील राख गोणीमध्ये पॅकिंग करून विक्री करतात. यासोबतच विविध प्रकारच्या शेतीसाठी लागणाºया टॉनिकची निर्मिती करण्यात येत असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीत समोर आल्याची माहिती कृषी विभागाचे अधिकारी जंजाळ आणि लोखंडे यांनी दिली. ताब्यात घेण्यात आलेल्या राखेच्या पोत्यांवर कुठेही खत असल्याचा उल्लेख नसल्याने ते राखेचीच विक्री करीत असल्याची माहिती त्यांनी दिली; मात्र त्यानंतरही त्यांनी राखेचे नमुने घेतले असून, या राखेच्या माध्यमातून ते खताची विक्री करीत असल्याचे किंवा या राखेमध्ये खत असल्याचे काहीही आढळल्यास अनिल पाटील यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचा इशारा कृषी विभागाच्या अधिकाºयांनी दिला.
खत आहे की नाही, याबाबत साशंकता!
पोलिसांनी जप्त केलेल्या बनावट खताच्या बॅगवर सिलिका पॉवर नमूद आहे. त्यामुळे हे खत आहे की नाही, या बाबत कृषी विभागाच्या अधिकाºयांनी शंका व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बºहाणपूरमध्ये राखेची खरेदी
सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील पंकज शिरभाते यांच्या आदित्य अॅग्रो केअर या कंपनीकडून प्राप्त झालेल्या खाली गोण्यांमध्ये अमानतपूर ताकोडा येथे राख भरून त्याचे ट्रक बºहाणपूर येथे पाठविण्यात येते. या ठिकाणी शेतकरी, तसेच मूर्ती बनविण्यासाठी आणि साचे बनविण्यासाठी या राखचा उपयोग करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे; मात्र नेमका हाच उपयोग होतो की नाही, हा तपासाचा भाग आहे.
शेतकºयांच्या फसवणुकीचा धोका
अनिल कुटे हे राखेची विक्री मध्य प्रदेशातील बºहाणपूर येथे करीत असल्याचे समोर आले. त्याचे देयकही देण्यात आले असले तरी मध्य प्रदेशातील शेतकºयांना खत म्हणून राख त्यांच्या माथी मारण्यात येते का, या बाबीचा तपास करण्याची गरज आहे. या ठिकाणावरून राख नेल्यानंतर मध्य प्रदेशात ती खतात मिसळून विक्री करण्याचा धोका असल्याची दाट शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या दिशेने तपास करण्याची गरज आहे.
पोलिसांनी जप्त केलेल्या राखेचे नमुने घेण्यात आले असून, ते चाचणीसाठी नागपूर येथील लॅबमध्ये पाठविण्यात आले आहे. यामध्ये ते बनावट खत असल्याचे आढळून आल्यास संबंधितांवर निश्चितच कारवाई होईल.
- नितीन लोखंडे, गुण नियंत्रक, कृषी विभाग, अकोला