हा माझा नव्हे, शिक्षकांचा विजय - किरण सरनाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 04:30 AM2020-12-05T04:30:48+5:302020-12-05T04:30:48+5:30

वाशिम : शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने शिक्षकांच्या समस्यांची जाण आहे. त्या साेडविण्यासाठी माझी सदैव धडपड असते. त्यात शिक्षकांनी ...

This is not my victory, the victory of teachers - Kiran Sarnaik | हा माझा नव्हे, शिक्षकांचा विजय - किरण सरनाईक

हा माझा नव्हे, शिक्षकांचा विजय - किरण सरनाईक

Next

वाशिम : शिक्षण क्षेत्रात कार्यरत असल्याने शिक्षकांच्या समस्यांची जाण आहे. त्या साेडविण्यासाठी माझी सदैव धडपड असते. त्यात शिक्षकांनी माझ्यावर टाकलेला विश्वास म्हणजेच हा केवळ माझा विजय नव्हे तर हा शिक्षकांचा विजय असल्याचे मत अमरावती शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेले अमरावती विभाग शिक्षक संघाचे उमेदवार किरणराव सरनाईक यांनी ४ डिसेंबर राेजी ‘लाेकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले.

आपल्या विजयाचे श्रेय काेणाला द्याल?

माझ्या विजयाचे श्रेय माझी समिती व ज्या शिक्षकांनी माझ्यावर विश्वास टाकून जबाबदारी साेपविली त्यांचे हे खरे श्रेय आहे. त्यांच्या मेहनतीने व त्यांच्याच विश्वासामुळे आज माझा विजय झाल्याचे मी समजताे.

अपक्ष म्हणून विजय मिळेल अशी अपेक्षा हाेती का?

या निवडणुकीत पक्षाला महत्त्वच नसते. जाे व्यक्ती शिक्षकांचे प्रश्न साेडविण्यासाठी पद नसताना कार्य करताे, ताेच खरा शिक्षकांचा कैवारी असताे. मी प्रामाणिकपणे शिक्षकांचे आजतागायत कार्य करीत आलाे. त्यामुळे पुढे कार्य करण्यासाठी संधी मिळाली. माझ्या कार्यामुळे व मतदारांच्या प्रतिसादामुळे विजयाची अपेक्षा हाेतीच.

विजयानंतर आपली रणनीती काय राहील?

मला माझ्या शिक्षक बांधवांनी निवडून दिले. शिक्षकांच्या समस्या, अडी-अडचणी साेडविणे माझे आद्यकर्तव्य आहे. त्यामुळे शिक्षकांच्या समस्यांसाठी वेळप्रसंगी जे काही करावे लागणार, ते मी करेल. शिक्षकांचा विकास हाच माझा ध्यास राहणार आहे. त्याकरिता ज्या रणनीतीचा अवलंब याेग्य असेल ताे करणार हे मात्र निश्चित.

आता आपला विजय झाला, काेणाकडे जाणार?

मी शिक्षकांचा आहे. शिक्षकांच्या बाजूला राहणार. ज्यांच्याकडे शिक्षकांच्या सन्मानाचा, न्यायाचा व हक्कासाठी न्याय मिळेल त्याकडे मी झुकेल. अजून तसे काहीही ठरले नाही.

आपला अजेंडा काय राहील?

शिक्षकांच्या हक्काच्या जुनी पेन्शन याेजनेचा प्रश्न साेडविण्यासाठी आपण सर्वात आधी प्रयत्न करणार आहे. हा शिक्षकांचा महत्त्वाचा व आवश्यक विषय आहे. या विषयावर आपण निवडणूक लढवून शिक्षकांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले हाेते. ते मिळवून देण्यासाठी सर्वात पहिला माझा प्रयत्न राहील. तसेच विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांच्या समस्यांनाही प्राधान्य देणार आहे.

शासनाच्या शिक्षण धाेरणाबाबत काय सांगाल?

अनेक दशकांपासून शिक्षकांवर अन्याय करणारी धाेरणे शासन राबवित आहे. ही धाेरणे बदलविण्यास शासनास आपण भाग पाडू. शिक्षकांना सन्मान मिळवून देण्यासाठी आपण प्रथम प्रयत्न करणार आहे.

Web Title: This is not my victory, the victory of teachers - Kiran Sarnaik

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.