महिलांसाठी असलेल्या प्रशिक्षण योजनांसाठी लाभार्थीच नाहीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:23 AM2017-10-31T01:23:52+5:302017-10-31T01:26:10+5:30
अकोला : महिला विकास कार्यक्रमातून महिलांना सक्षम करण्यासाठी चालू वर्षात मंजूर असलेल्या प्रशिक्षण योजनांसाठी लाभार्थी अर्जच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे हा निधी प्रकल्प स् तरावर खर्च करण्यासाठी देण्याबाबतची चर्चा सोमवारी महिला व बालकल्याण समितीच्या तहकूब सभेत झाली. गेल्यावर्षी प्रशिक्षण योजना बारगळल्या होत्या, हे विशेष.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : महिला विकास कार्यक्रमातून महिलांना सक्षम करण्यासाठी चालू वर्षात मंजूर असलेल्या प्रशिक्षण योजनांसाठी लाभार्थी अर्जच प्राप्त झाले नाहीत. त्यामुळे हा निधी प्रकल्प स् तरावर खर्च करण्यासाठी देण्याबाबतची चर्चा सोमवारी महिला व बालकल्याण समितीच्या तहकूब सभेत झाली. गेल्यावर्षी प्रशिक्षण योजना बारगळल्या होत्या, हे विशेष.
महिला सक्षमीकरणासाठी मंजूर असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये महिला समुपदेशन केंद्र चालवणे, दुग्धजन्य पदा र्थांचे उत्पादन करणे, ७ ते १२ वी उत्तीर्ण मुलींना संगणक प्रशिक्षण, मोबाइल, संगणक दुरुस्ती, बेकिंग व कॅटरिंग प्रशिक्षण, ग्रामीण भागातील महिला व मुलींना नर्स, परिचारिकेचे प्रशिक्षण देणे, सौंदर्य प्रसाधने प्रशिक्षण, पदवीधर मुलींना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे पूर्व प्रशिक्षण, मराठी व इंग्रजी टायपिंग, किशोरवयीन मुली व महिलांना जेंडर, आरोग्य, कुटुंबनियोजन कायदेविषयक प्रशिक्षण, शिवणकाम, फॅशन डिझायनिंग प्रशिक्षण, बालवाडीसेविका, मदतनीस यांच्यासाठी प्रशिक्षण, महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षण योजनांचा समावेश आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून अर्जही मागवण्यात आले. मात्र, एकही अर्ज प्राप्त झाला नाही. त्यामुळे हा निधी खर्च करण्यासाठी बालविकास प्रकल्प अधिकार्यांना दिला जाणार आहे. सभेला सभापती देवका पातोंड, सदस्य माया कावरे, ज्योत्स्ना बहाळे, वेणू चव्हाण, रमीजाबी शेख साबीर, मंजूषा वडतकार, मंगला तितूर, आशा एखे यांच्यासह महिला व बालकल्याण अधिकारी योगेश जवादे उपस्थित होते.
वैयक्तिक लाभार्थी यादी मंजूर
सभेत वैयक्तिक लाभाच्या योजनांची यादी मंजूर करण्यात आली. त्यामध्ये सायकल, पिको फॉल मशीन, शिलाई मशीन, सौर कंदील योजनेचा समावेश आहे. त्यामध्ये तीनही योजनांसाठी अकोट तालुक्यातील १६0, मूर्तिजापूर-१५५, पा तूर-७८, बाळापूर-१३७, अकोट-२६१, बाश्रीटाकळी-२३५ लाभार्थींचा समावेश आहे, तर अकोला तालुक्यातील लाभार्थी संख्या उशिरापर्यंत प्राप्त झाली नव्हती.