रुग्ण नोंदणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘एनसीडी’ केंद्राला मिळाले नाहीत टॅब!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 01:49 PM2020-03-01T13:49:49+5:302020-03-01T13:50:09+5:30

अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे.

Not single NCD center receives tabs for Patient Registration! | रुग्ण नोंदणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘एनसीडी’ केंद्राला मिळाले नाहीत टॅब!

रुग्ण नोंदणीसाठी दुसऱ्या टप्प्यातील ‘एनसीडी’ केंद्राला मिळाले नाहीत टॅब!

Next

अकोला : असंसर्गजन्य आजारांनी ग्रस्त रुग्णांचे निदान करून त्यांचा संपूर्ण उपचार व्हावा, या अनुषंगाने आरोग्य विभागातर्फे राज्यभरात प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर पॉपुलेशन बेस सर्व्हे सुरू केला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील काही जिल्ह्यात हा उपक्रम यशस्वी झाला आहे; मात्र दुसºया टप्प्यात अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे.
राज्यात असंसर्गजन्य आजारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. या आजारांचे वेळीच निदान होऊन रुग्णांना योग्य उपचार मिळावा, यासाठी आरोग्य विभागातर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. गत वर्षभरापासून राज्यात एनसीडी केंद्रांतर्गत जिल्हा तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रस्तरावर रुग्णांची तपासणी करून, असंसर्गजन्य आजारांचे निदान करण्यात येत आहे. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, स्ट्रोक या सारख्या असंसर्गजन्य आजाराचे प्रमाण लक्षणीय वाढले आहे. या रुग्णांची नोंद प्राथमिक आरोग्य केंद्रावर कार्यरत एएनएम परिचारिकांमार्फत करण्यात येत आहे. रुग्णावर झालेल्या संपूर्ण उपचाराची नोंद केंद्रीकृत आणि आॅनलाइन व्हावी, या उद्देशाने पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत टॅबचा उपयोग करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात विभागातील अमरावती आणि वाशिमसह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णांची नोंद टॅबवर करण्यात आली होती; मात्र बहुतांश जिल्ह्यांमध्ये अद्यापही टॅब उपलब्ध न झाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच होत आहे.

कम्युनिटी हेल्थ आॅफिसरची महत्त्वाची भूमिका
या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागात कम्युनिटी हेल्थ आॅफिसरचे पद भरण्यात आले आहेत. बीएमएस डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली आशा आणि एएनएम रुग्णांची नोंद ठेवणार आहेत. यासाठी त्यांना ६ महिन्यांचे प्रशिक्षणही दिले आहे. त्यांच्यावरच असंसर्गजन्य आजारांचे निदान व रुग्णांच्या सर्वांगीण उपचाराची जबाबदारी राहणार आहे.

जिल्ह्यात पॉपुलेशन बेस सर्व्हे अंतर्गत असंसर्गजन्य आजारांवर विशेष लक्ष दिले जात आहे. उपक्रमांतर्गत ‘एएनएम’कडे टॅब दिला जाणार आहे. रुग्णाच्या संपूर्ण उपचारापर्यंतची माहिती त्यामध्ये अद्ययावत केली जाणार आहे. यापूर्वी हा उपक्रम राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये यशस्वी राबविण्यात आला आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला.

 

Web Title: Not single NCD center receives tabs for Patient Registration!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.