महिनाभरात कोविडचा एकही बळी नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:21 AM2021-09-21T04:21:10+5:302021-09-21T04:21:10+5:30
मृत्यूचा आकडा १,१३६ वर स्थिरावला जिल्ह्यात कोविडचा शेवटचा बळी १७ ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर येथील एका ८० वर्षीय महिलेचा गेला ...
मृत्यूचा आकडा १,१३६ वर स्थिरावला
जिल्ह्यात कोविडचा शेवटचा बळी १७ ऑगस्ट रोजी मूर्तिजापूर येथील एका ८० वर्षीय महिलेचा गेला होता. त्यानंतर आजपर्यंत कोविडमुळे मृत्यू झाल्याची एकही नोंद नाही. त्यामुळे जवळपास महिनाभरापासून जिल्ह्यातील कोविडमुळे मृत्यू झाल्याचा आकडा १,१३६ वर स्थिरावला आहे. अकोलेकरांसाठी ही दिलासादायक बाब असली तरी नागरिकांनी गंभीर लक्षणांकडे दुर्लक्ष करणे धोक्याचे ठरू शकते.
कोरोना संदिग्ध रुग्णांच्या चाचण्या सातत्याने सुरू आहेत. नव्याने पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण कमी झाले आहे, मात्र अजूनही रुग्ण आढळून येत आहेत. ही परिस्थिती दिलासा देणारी असली, तरी कोविडचा धोका अजूनही कायम आहे. कोविडपासून स्वत:च्या बचावासाठी प्रत्येक नागरिकाने त्रिसूत्रीचे पालन करावे.
- डॉ. वंदना पटोकार (वसो), जिल्हा शल्यचिकित्सक,अकोला