विदर्भाचा नव्हे केवळ नागपुरचा विकास - पृथ्वीराज चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2018 06:14 PM2018-12-08T18:14:17+5:302018-12-08T18:14:30+5:30
बाळापूर : एकेकाळी अकोला जिल्हा ‘कॉटन सिटी’च्या नावाने ओळखल्या जात होता. पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्ष करून केवळ नागपुरचा विकास दाखवला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.
बाळापूर : एकेकाळी अकोला जिल्हा ‘कॉटन सिटी’च्या नावाने ओळखल्या जात होता. पश्चिम विदर्भाकडे दुर्लक्ष करून केवळ नागपुरचा विकास दाखवला जात असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. ते बाळापूर येथे काँग्रसच्या जनसंघर्ष यात्रेंतर्गंत आयोजित सभेत बोलत होते.
पृथ्वीराज चव्हाण पुढे म्हणाले की, केंद्र सरकारला मरकटी सरकार असून राफेल प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उत्तर देता येत नसल्याने त्यांनी तात्काळ सीबीआय संचालकांना हटविण्याची घाई केली. यातच भ्रष्टाचार दडला असून ‘न खाऊंगा, ना खाने दुंगा’ची भाषा आता बदलत आहे. २०१४ मध्ये दिलेले अच्छे दिन, नोटबंदी, जीएसटी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, शेतकरी आत्महत्या, बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासनापैकी कुठलेही आश्वसन सरकारने पूर्ण केलेला नाही. जिल्ह्यातील भ्रष्टाचार उघड झाल्यावरही भाजपचे पदाधिकारी का बोलत नाही, असा सवालही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी केला.
कार्यक्रमाला अतिथी म्हणून विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री वसंतराव पुरके, अ. भा. काँग्रेसचे पदाधिकारी आशिष दुवा, माजी राज्यमंत्री रामदास बोडखे, आ. आशिष देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष हिदायत पटेल, अकोला महानगर काँग्रेस अध्यक्ष बबनराव चौधरी, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष एस. एन. खतीब, जिल्हा काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश तायडे, प्रदेश प्रवक्ते डॉ. सुधीर ढोणे, नगराध्यक्ष सै. एैनोद्दीन खतीब आदी होते. माजी मंत्री वसंत पुरके, आ. आशिष देशमुख, एस. एन. खतीब आदी मान्यवर उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)