जलकुंभ उभारण्यास इच्छुक नाही; कंत्राटदाराचे मनपाला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:15 AM2021-06-25T04:15:01+5:302021-06-25T04:15:01+5:30

अकाेलेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील जलण्द्धीकरण केंद्रापासून ते शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलण्यासह प्रभागांमधील जुनी जलवाहिनी बदलणे तसेच नवीन ...

Not willing to build a pond; Contractor's letter of intent | जलकुंभ उभारण्यास इच्छुक नाही; कंत्राटदाराचे मनपाला पत्र

जलकुंभ उभारण्यास इच्छुक नाही; कंत्राटदाराचे मनपाला पत्र

Next

अकाेलेकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या महान येथील जलण्द्धीकरण केंद्रापासून ते शहरापर्यंत मुख्य जलवाहिनीचे जाळे बदलण्यासह प्रभागांमधील जुनी जलवाहिनी बदलणे तसेच नवीन आठ जलकुंभांची उभारणी करण्यासाठी महापालिकेला २०१६ मध्ये ‘अमृत अभियान’अंतर्गत ११० काेटी रुपये मंजूर झाले हाेते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने तयार केलेल्या ‘डीपीआर’नुसार मनपा प्रशासनाने ८७ काेटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली. मनपाला जीएसटीनुसार ९२ काेटी रुपयांचे देयक अदा करावे लागतील. सन २०१७ मध्ये कार्यादेश दिल्यानंतर ‘एपी ॲण्ड जीपी’ एजन्सीने दाेन वर्षांच्या कालावधीत ही याेजना निकाली काढणे अपेक्षित हाेते. मागील चार वर्षांपासून अद्यापही याेजनेचे काम पूर्णत्वास आले नसल्याचे चित्र आहे.

पाेलीस प्रशासनाकडे जमा केले पैसे

जलकुंभाच्या उभारणीत अडथळा निर्माण करणाऱ्या रहिवाशांच्या विराेधात मनपाने डाबकी राेड पाेलीस ठाण्यात यापूर्वी तक्रार केली हाेती. त्याविराेधात पाेलिसांकडून प्रभावी कारवाई झाली नसल्याची माहिती आहे. ही बाब लक्षात घेता जलप्रदाय विभागाने पाेलीस बंदाेबस्तासाठी पाेलीस प्रशासनाकडे रकमेचा भरणा केला. परंतु अद्याप मनपाला पाेलीस बंदाेबस्त उपलब्ध करून देण्यात आला नाही, हे येथे उल्लेखनीय.

...तर अनेक तांत्रिक अडचणी उद्भवतील

जुने शहरात जलकुंभाची उभारणी करण्यापूर्वी प्रकल्प अहवालनुसार जलवाहिनीचे जाळे टाकण्याचे नियाेजन करण्यात आले हाेते. त्यानुसार जाळे टाकण्यातही आले. या ठिकाणी मनपाची मिळमिळीत भूमिका लक्षात घेऊनच कंत्राटदाराने काढता पाय घेतल्याचे बाेलले जात आहे. जलकुंभाचे बांधकाम न झाल्यास मनपाला भविष्यात अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची माहिती आहे.

Web Title: Not willing to build a pond; Contractor's letter of intent

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.