पक्षाचे धोरण लक्षात घ्या; बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:15 AM2021-07-18T04:15:01+5:302021-07-18T04:15:01+5:30
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या संघटनात्मक समीक्षा बैठकीत त्या बोलत होत्या. पक्ष संघटनेत पक्षाच्या धोरणानुसार गांभीर्यपूर्ण काम करण्याची गरज ...
वंचित बहुजन आघाडी अकोला जिल्ह्याच्या संघटनात्मक समीक्षा बैठकीत त्या बोलत होत्या. पक्ष संघटनेत पक्षाच्या धोरणानुसार गांभीर्यपूर्ण काम करण्याची गरज असून, पक्ष कार्यक्रमांच्या अंमलबजावणीत हलगर्जी, गटबाजी आणि पक्ष धोरणाच्या विरोधातील काम अशा प्रकारचा कोणताही बेशिस्तपणा खपवून घेतला जाणार नाही. त्यामुळे पक्ष संघटनेच्या धोरणानुसार पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे. पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी काम करणाऱ्या नवोदित कार्यकर्त्यांना पक्षात संधी दिली जाणार असल्याचे संकेतही प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी दिले. या बैठकीत वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डाॅ.धैर्यवर्धन पुंडकर, गाेविंद दळवी, महिला आघाडीच्या प्रदेश महासचिव अरुंधती शिरसाट, युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष नीलेश विश्वकर्मा यांनीही मार्गदर्शन केले. बैठकीचे सूत्रसंचालन युवक आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी केले. यावेळी महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्ष सविता मुंडे, प्रदेश सदस्य किरण गिर्हे, अक्षय बनसोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, प्रभा शिरसाट, जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड, समाजकल्याण सभापती आकाश शिरसाट, शोभा शेळके, पुष्पा इंगळे, शंकरराव इंगळे, वंदना वासनिक, डाॅ. प्रसन्नजीत गवई, सचिन शिराळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पक्ष वेगवेगळे असले तरी एकमेकांना पूरक!
भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना इत्यादी राजकीय पक्ष वेगवेगळे असले तरी, ते एकमेकांना पूरक आहेत. त्यामुळे यासंदर्भात सावध राहून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काम करण्याची गरज असल्याचे प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या
निवडणुकांवर विशेष भर
राज्यातील जिल्हा परिषदा, पंचायत समित्या, महानगरपालिका, नगरपालिका इत्यादी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवर वंचित बहुजन आघाडीचा विशेष भर राहणार असून, पूर्ण ताकदीनिशी पक्ष या निवडणुका लढणार असल्याची घोषणाही रेखा ठाकूर यांनी या बैठकीत केली.
......................फोटो............................