२१ ग्रामपंचायतींना दिली नोटिस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 02:47 AM2017-07-31T02:47:07+5:302017-07-31T02:47:07+5:30
अकोला: अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: अनेक गावातील पाण्याचे शुद्धीकरण न होताच पुरवठा केला जात आहे. त्यामुळे पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य साथरोगाची स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामपंचायतींनी शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास त्यांची जबाबदारी निश्चित करण्याचा इशारा जिल्ह्यातील २१ ग्रामपंचायतींना बजावलेल्या नोटिसमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी दिला आहे.
जिल्हास्तरीय पथक तसेच आरोग्य कर्मचाºयांनी जूनमध्ये गावांतील पाणीपुरवठा योजना, स्रोतांतून नमुने गोळा केले. त्याची तपासणी जिल्हा सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत करण्यात आली. पाणी नमुने तसेच ब्लिचिंग पावडरचीही तपासणी झाली. त्या तपासणीमध्ये ब्लिचिंग पावडरची गुणवत्ता कमालीची घसरलेली आढळली. त्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण २० टक्क्यांपेक्षाही कमी असल्याचे स्पष्ट झाले. तसेच २१ पेक्षाही अधिक ग्रामपंचायतींमध्ये ब्लिचिंग पावडरच उपलब्ध नसल्याची माहिती पुढे आली. पावसाळ््याच्या दिवसात ग्रामस्थांना ब्लिचिंग पावडरने निर्जंतुक केलेल्या शुद्ध पाण्याचा पुरवठा होणे आवश्यक आहे; मात्र या महत्त्वाच्या बाबींकडेच ग्रामपंचायती दुर्लक्ष करीत असल्याचा प्रकार घडत आहे. त्यामुळेच सध्या पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य आजाराच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचेही पुढे आले आहे. अकोला, अकोट, बाळापूर तालुक्यातील गावांमध्ये ही संख्या मोठी आहे. त्याची गंभीर दखल मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी घेतली आहे.
जलजन्य आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ
तीन तालुक्यातील गावांमध्ये सातत्याने जलजन्य आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे नोटिसमध्ये नमूद करण्यात आले आहे. त्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, पोटदुखी, हगवण, अतिसार, विषमज्वर या आजारांच्या रोग्यांचा समावेश आहे. या आजारांचा उद्रेक टाळण्यासाठी पाणी शुद्धीकरणाचे निर्देश देण्यात आले आहेत.
सहा महिन्यांपासून अशुद्ध पाणीपुरवठा
साथरोग मासिक अहवालानुसार जिल्ह्यातील २१ गावांमध्ये सहा महिन्यांपासून ब्लिचिंग पावडरच नसल्याचे नमूद आहे. अकोला तालुक्यातील अलियाबाद, चाचोंडी, सिसा, बोंदरखेड, शिवणी, मलकापूर, शिवर, सोमठाणा, दुधाळा, मंडाळा, अमानतपूर ताकोडा, बादलापूर, बाळापूर तालुक्यातील सोनगिरी, दगडखेड, स्वरूपखेड, शिंगोली, सोनाळा, चिंचोली, धाडी बल्हाडी या गावांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, ही गावे खारपाणपट्ट्यातील आहेत. याप्रकरणी दोन्ही गटविकास अधिकाºयांनाही २० जुलै रोजी नोटिस बजावण्यात आली आहे.
ब्लिचिंग पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाण राखा
गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी ग्रामपंचायतींनी ब्लिचिंग पावडरचा वापर करणे आवश्यक आहे. त्याशिवाय, पावडरमध्ये क्लोरिनचे प्रमाणही आवश्यकतेएवढे राखण्याचेही बजावले आहे.
पावसाळ््याच्या दिवसात जलजन्य आजारांपासून ग्रामस्थांचे रक्षण व्हावे, यासाठी ग्रामपंचायतींना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. गावात शुद्ध पाणीपुरवठा झाल्यास या रोगांना प्रतिबंध होतो.
- डॉ. हरी पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद.