आकोट मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस

By Admin | Published: October 11, 2014 12:40 AM2014-10-11T00:40:14+5:302014-10-11T00:40:59+5:30

चौघांना कारणे दाखवा नोटीस तर दोन कोतवाल निलंबित.

Notice to candidates from Akot constituency | आकोट मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस

आकोट मतदारसंघातील उमेदवारांना नोटीस

googlenewsNext

आकोट (अकोला): आकोट विधानसभा निवडणूक लढविणार्‍या उमेदवारांनी निवडणूक दैनंदिन खर्चाचे विवरण पत्र ११ ऑक्टोबरपर्यंत सादर न केल्यास लोकप्रतिनिधी अधिनियम १९५१ अन्वये आचारसंहितेचा भंग करीत असल्याच्या कारणावरून कारवाई करण्यात येणार असल्याच्या नोटीस १८ उमेदवारांना देण्यात आल्या असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दिली.
निवडणूक खर्च निरीक्षक यांनी यापूर्वी सभा बोलाविली असता सर्व उमेदवारांनी आपला खर्च अद्ययावत करून तपासणीस सादर करण्याबाबत निर्देश दिले होते; परंतु अद्यापही उमेदवारांनी आपला खर्च सादर न केल्यामुळे ११ ऑक्टोबर
रोजी दुपारी २ ते ५ या वेळात निवडणूक खर्च लेखा पथक यांच्याकडे सादर करावे, अशा आशयाच्या नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी सर्व उमेदवारांना बजावल्या आहेत.
उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी निवडणूक खर्च सादर न केल्यास आचारसंहितेच्या सदराखाली गुन्हे दाखल होणार असल्याचे संकेत प्राप्त होत आहेत.

*चौघांना कारणे दाखवा नोटीस
निवडणूक निरीक्षक (खर्च) निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार उल्लंघन करून निवडणूक कामात दिरंगाई केल्याबाबत आपले स्पष्टीकरण सादर करावे अन्यथा का कारवाई करण्यात येऊ नये, अशा आशयाच्या कारणे दाखवा नोटीस निवडणूक निर्णय अधिकारी यांनी एस.एस. धुर्वे, पी.एम. बनसोड, डी.डी. वक्ते यांना बजावल्या आहेत तर आदर्श आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करीत असल्याप्रकरणी ए.पी. साल्पेकर यांनासुद्धा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच आचारसंहिता अनुपालन करण्यासंबंधी उमेदवार अथवा राजकीय पक्ष यांचा अहवाल सादर करण्याबाबत भरारी पथक प्रमुख एन. पी. नेमाडे, व्ही. जी. इंगोले यांनासुद्धा सूचना देण्यात आल्या आहेत.

*दोन कोतवाल निलंबित
विधानसभा निवडणुकीत आपल्या कर्तव्यात कसूर केल्यामुळे आकोट महसूल विभागातील जऊळकाचे कोतवाल आसिफशाह मन्नासशाह व आकोलखेडचे कोतवाल नारायण मोतीराम तायडे यांचेवर निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शैलेश हिंगे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

Web Title: Notice to candidates from Akot constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.