बाजार समितीच्या चार संचालकांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 01:42 AM2017-10-04T01:42:09+5:302017-10-04T01:42:24+5:30
अकोट : अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शंकरराव चौधरी, मोहनराव जायले, रमेश बोंद्रे व रामबिलास अग्रवाल या चार संचालकांनी अनर्हता प्राप्त केल्यामुळे अपात्र ठरविण्यातबाबतची तक्रार अर्ज जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे आतिष प्रमोद बिडवे यांनी केला. या अर्जावरून ३ ऑक्टोबर रोजी दुपारपर्यंत त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी चार संचालकांना नोटीस पाठवण्यात आल्या होत्या. संचालकांच्या वकिलांनी या नोटीसला उत्तर देण्याकरिता १५ दिवसांचा अवधी मागितला असल्याची माहिती आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

अकोला शहरातील मलकापूर भागातील रहिवासी आतिष प्रमोद बिडवे यांनी १२ जून रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे तक्रार देऊन चार संचालकांनी पदावर असताना महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६३ मधील तसेच महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियम) नियम १९६७ मधील तरतुदींचे व उपविधीचे वारंवार उल्लंघन केले असल्यामुळे ४१ (१) (आय) व (क) अंतर्गत त्यांच्या पदाला अनर्हता प्राप्त झाली आहे.
त्यामुळे ते संचालक म्हणून पदावर राहू शकत नाहीत, त्यामुळे त्यांना अपात्र घोषित करण्यात यावे, अशी विनंती तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
जिल्हा उपनिबंधकांनी या अर्जावर खुलासा सादर करण्यासाठी संचालक शंकरराव चौधरी, मोहनराव जायले, रमेश बोंद्रे व रामबिलास अग्रवाल यांना स्वत: किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत बाजू मांडण्यासाठी नोटीस दिल्या. त्यानुसार २ ऑक्टोबर रोजी संचालकाच्या वकिलांनी उत्तर देण्याकरिता पंधरा दिवसांचा अवधी मागितला असल्याची माहिती सूत्राने दिली.