बुडीत क्षेत्रात बांध : सहा अधिका-यांना नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 03:27 AM2017-07-27T03:27:12+5:302017-07-27T03:27:12+5:30
अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे यांच्यासह सहा जणांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली.
सदानंद सिरसाट।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जलयुक्त शिवार अभियानांतर्गत पातूर तालुक्यातील भानोस येथील साखळी सिमेंट नाला बांध बुडीत क्षेत्रात निर्माण करून शासनाचा लाखो रुपये निधी पाण्यात घालविणाºया अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे यांच्यासह सहा जणांना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी कारणे दाखवा नोटिस बजावली. त्याचे स्पष्टीकरण प्राप्त न झाल्याने त्या सर्वांना आता तीन दिवसांत ते सादर करण्याचे बजावण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाने आधीच भानोस-२ या कोल्हापुरी बंधाºयाची निर्मिती केली आहे. भानोस येथे त्याच नाल्यावर पातूर तालुका कृषी विभागाने सिमेंट काँक्रिट नाला बांधांची कामे केली. कोल्हापुरी बंधाºयाच्या वरील बाजूस पाच साखळी सिमेंट काँक्रिट नाला बांध टाकण्यात आले. जवळपास सर्वच बांध कोल्हापुरी बंधाºयाच्या बुडीत क्षेत्रात आहेत.
एक सिमेंट नाला बांध बंधाºयाच्या वरच्या बाजूस केवळ १५० मीटर अंतरावर आहे. अंदाजपत्रकात त्या बंधाºयाच्या साठ्याची लांबी ९०० मीटर आहे. याबाबतची तक्रार संजय सुरवाडे यांनी केली. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २० एप्रिल २०१७ रोजी प्रसिद्ध केले. चौकशीसाठी अकोटचे उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांनाच नेमण्याचा प्रकार अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र निकम यांनी केला. त्यानंतर गठीत समितीचा अहवाल प्राप्त होताच अधिकारी-कर्मचाºयांसह सहा जणांना कारणे दाखवा नोटिस बजावली; मात्र त्यापैकी कुणीही स्पष्टीकरण दिले नाही.
‘लोकमत’च्या वृत्तानंतर स्मरणपत्राची आठवण
चौकशी अहवालातील मुद्यांचे वृत्त ‘लोकमत’ने २१ जुलैच्या अंकात प्रसिद्ध केले. तोपर्यंत संबंधित अधिकाºयांचे स्पष्टीकरण का आले नाही, हे विचारण्याचीही तसदी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने घेतली नाही. वृत्त प्रसिद्ध होताच संबंधिताने स्मरणपत्र तयार केले. त्यावर तीन दिवस अधीक्षक कृषी अधिकाºयांची स्वाक्षरीच न झाल्याने ते कार्यालयातच पडून असल्याची माहिती आहे.
कंडारकर, मकासरे, फुलारी, डोंगरे यांना नोटिस
भानोस पाणलोट क्षेत्रातील आय-१ ते आय-९ या बांधाच्या कामांसाठी कृषी सहायक अमोल इडोळे, पर्यवेक्षक आर. एस. फुलारी, मंडळ कृषी अधिकारी सागर डोंगरे, तालुका कृषी अधिकारी एस.एम. मकासरे, उपविभागीय कृषी अधिकारी अशोक कंडारकर यांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून स्पष्टीकरण न आल्याने उद्या गुरुवारी त्यांना स्मरणपत्र दिले जाणार आहे.